रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By

आधुनिक योगाचे जनक योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार

B. K. S. Iyengar
दर वर्षी २१ जून रोजी जागतिक योग दिवस साजरा करण्यात येतो पण आपल्याला हे माहीत आहे का की आपले प्राचीन पद्धतीने केलेलं योग, व्यायामाचा ह्या प्रकाराला जगामध्ये कोणी प्रसिद्धी मिळवली आहे?
 
योगाचार्य बेल्लूर कृष्णमाचार सुंदरराजा अय्यंगार (बी. के. एस. अय्यंगार) हे एक भारतीय योग प्रशिक्षक व लेखक होते ज्यांनी जागतिक स्तरावर योग सादर केले. त्यांना अय्यंगार योगा ह्या हठ योग पद्धतीचे जनक मानले जाते. भारत तसेच जगभर योगासने लोकप्रिय करण्याचे श्रेय अय्यंगारांना दिले जाते.
 
कर्नाटकचे बेल्लूरच्या कोलार डिस्ट्रिक्टमध्ये १४ डिसेंबर १९१८ रोजी यांचा जन्म झाला. यांचे वडील श्री कृष्णमाचार आणि आई शेषम्मा होत्या. यांनी "अय्यंगार योगा" म्हणून एक योगाची स्थापना केली आणि जागतिक स्तरावर योगाला ‘व्यायामाच्या एक प्रकार’ म्हणून प्रसिद्धी मिळवली.
 
लहाण वयामध्ये ते मलेरिया, टायफॉईड, क्षयरोग (टी.बी), सामान्य कुपोषण अशा आजारांनी ग्रसित होते. १९३४ मध्ये त्यांना योगी श्री तिरुमलाई कृष्णमाचार्य (आधुनिक योगाचे जनक) यांनी म्हैसूर येथे बोलावलं आणि योगामध्ये प्रशिक्षित केलं. अय्यंगार म्हणतात २ वर्षाच्या अभ्यासात योगी तिरुमलाई यांनी फक्त १०-१५ दिवस त्यांना शिकवलं पण ते १०-१५ दिवस यांचे आयुष्याचे महत्वपूर्ण दिवस सिद्ध झाले ज्यामुळे त्यांची आणि त्यांच्या आयुष्याची कायाच पलटली आणि येथून सुरु झाली होती योगाला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवायची कहाणी.
 
योगाचार्य आय्यंगार हे पहिल्यांदा १९५४ साली प्रसिद्ध व्हॉयलीन वादक येहुदी मेनुहिन यांचा आमंत्रणावर स्वीतझरलँड (युरोप) येथे योग शिकवायला गेले होते. त्यानंतर १९५६ साली अमेरिकेचे ऍन अर्बोर, मीशींगेन शेहेरात त्यांना योग शिकवायची संधी मिळाली आणि या प्रकारे ते पहिल्यांदा अमेरिकेत गेले.
 
अय्यंगार यांनी जय प्रकाश नारायण यांना देखील योग शिकवले, इतकंच नव्हे तर बेल्जियमच्या महाराणी एलिसाबेथ यांना ८०च्या वयात शीर्षासन शिकवले आणि असे किती तरी प्रसिद्ध लोकं आहेत जी यांना खूप मानतात जसे उपन्यासकार ऑलडस हुक्सली, अन्नेट्टे बेनिंग, सचिन तेंडुलकर, करीना कपूर.
 
वर्ष १९६६ साली यांनी स्वत: ची पहिली पुस्तक "लाइट ऑन योगा" प्रकाशित केली ज्याच्यात २०० पेक्षा जास्त योगासने आहेत. यांची "लाइट ऑन प्राणायाम" , "लाइट ऑन  योगा सूत्रास ऑफ पतंजली", "लाइट ऑन लाइफ" सारखी अनेक पुस्तके आहे.
 
अय्यंगार यांनी वर्ष १९७५ मध्ये त्यांच्या अर्धांगिनींच्या स्मरणार्थ "रामामनी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिटयूट" ची स्थापना पुणे येथे केली.
 
भारताला जागतिक स्तरावर योगा क्षेत्रात इतका सन्मान आणि ओळख देणारे योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांना भारताचे तीन प्रमुख सन्मान देण्यात आले. अय्यंगारांच्या योगामधील अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने त्यांना १९९१ साली पद्मश्री, २००२ साली पद्मभूषण तर २०१४ साली पद्मविभूषण हे पुरस्कार बहाल केले. वर्ष २००४ मध्ये यांचे नाव टाइम्स मॅगझिनच्या जगाचे १०० सगळ्यात प्रभावी लोकं म्हणून समाविष्ट करण्यात आले. आज हजार पेक्षा जास्त योग प्रशिक्षक CIYTs (प्रमाणित अय्यंगार योग शिक्षक) आहेत, त्यातून फक्त युनायटेड स्टेट्समध्ये ११०० इतके आहेत. २० ऑगस्ट २०१४ मध्ये पुणे येथे ९५ वयामध्ये यांनी प्राण सोडले.