शीर्षासन कसे करावे त्याचे 7 फायदे जाणून घेऊ या

yogasan
Last Modified शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (20:58 IST)
हे आसन डोक्यावर केल्यामुळे ह्याला शीर्षासन असे म्हणतात. हे आसन करायला कठीण आहे.हे आसन एखाद्या योग्य शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या अंतर्गत करावे.अन्यथा मानेची दुखापत होऊ शकते.किंवा इतर कोणती समस्या उद्भवू शकते. चला तर मग शीर्षासन करण्याची योग्य पद्धत आणि नियमितपणे केल्याचे फायदे जाणून घेऊ या.


पद्धत-
1 सर्वप्रथम हे आसन एखाद्या भिंतीचा आधार घेऊन करा. जेणे करून पडण्यापासून वाचू शकता. म्हणजे आपली
पाठ भिंतीकडे असावी.

2 दोन्ही गुडघे जमिनीवर ठेवून हाताचे कोपरे जमिनीवर ठेवा. हाताच्या बोटाना एकत्र करून पकड घट्ट करा. नंतर डोकं तळहाताच्या जवळ जमिनीवर टिकवून द्या. असं केल्यानं डोक्याला आधार मिळेल.

3 नंतर गुडघे जमिनीपासून वर उचलून पाय लांब करा.हळू हळू पाऊले टाकत कपाळ पर्यन्त घेऊन या नंतर हळुवारपणे गुडघे दुमडून नंतर हळूहळू वर करत पाय सरळ करा. शरीराचा भार पूर्णपणे डोक्यावर टाका.

*कालावधी -
काही काळ याच अवस्थेत राहून पुन्हा सामान्य अवस्थेमध्ये येण्यासाठी सर्वप्रथम गुडघे दुमडून पोटापर्यंत आणून तळहात जमिनीवर ठेवा. नंतर कपाळ जमिनीला स्पर्श करत काही काळ ह्याच स्थितीत राहून डोक्याला सरळ करून वज्रासनाच्या स्थितीत बसून पूर्व स्थितीत या.

* खबरदारी -
* सुरुवातीला हे आसन भिंतीच्या साहाय्याने करा आणि योग्य प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली करावे.
* डोक्याला जमिनीला स्पर्श करताना हे लक्षात ठेवा की डोक्याचा तोच भाग टेकलेला आहे, ज्यामुळे मान आणि पाठीचा कणा सरळ राहील. पाय अलगदपणे वर उचला.नियमितपणे सराव केल्यावर हे स्वतःच वर येऊ लागतात.

* पुन्हा सामान्य स्थितीमध्ये येण्यासाठी पाय अलगदपणे जमिनीवर ठेवा. डोके अचानक उचलू नका. पाय जमिनीवरच ठेवा. डोके तळहाताच्या दरम्यान आल्यावरच वज्रासनात यावे.

*ज्यांना मणक्याचा त्रास आहे मेंदूचा त्रास आहे किंवा पोटाचा काही आजार आहे त्यांनी हे आसन अजिबात करू नये.


* हे आसन केल्याचे फायदे जाणून घेऊ
1 पचन तंत्राला फायदा होतो.
2 मेंदूमध्ये रक्त पुरवठा वाढतो. यामुळे स्मरण शक्ती वाढते.
3
हिस्टिरिया किंवा उन्माद अंडकोषाची वाढ,हार्निया, बद्धकोष्ठता इत्यादी आजार दूर होतात.
4 केसांची गळती आणि केस पांढरे होण्याची समस्या दूर करतात.
5 डोळ्यांची दृष्टी वाढते.
6 चेहऱ्याच्या सुरकुत्या कमी होतात.
7 या आसनाचा सराव केल्यानं गाल लोंबकळतं नाही.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

आपल्या फ्रेडला गिफ्ट नव्हे तर हे भेट करा... आयुष्यभर किंमत ...

आपल्या फ्रेडला गिफ्ट नव्हे तर हे भेट करा... आयुष्यभर किंमत कमी होणार नाही
मैत्री हे असे नाते असते जेव्हा कुटुंबात कोणी नसते, तर मित्र म्हणजे दुसरे कुटुंब असते. सुख ...

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात
गेल्या काही दिवसांपासून मैत्री दिवस साजरा करण्यासाठी जंगी तयारी चाललेली आहे. फ्रेंडशिप ...

फूल पाखरा

फूल पाखरा
फूल पाखरा, फूल पाखरा नको मारु भरारी उंच उंच उडताना पाहून दु:ख माझ्या मना भारी नाजुक ...

मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण

मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण
मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण, कधीही कुठं ही मोकळं करता येतं मन,

उपवासाचा Batata Vada

उपवासाचा Batata Vada
बटाटे मॅश करुन घ्या. त्यात वाटलेल्या मिरच्या, आले व जिरं याची पेस्ट घाला. मीठ, लिंबाचं ...