रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (14:28 IST)

सकाळच्या नित्यक्रमात हे 5 योगासन सामील करा आणि उत्साही राहा

दिवसाची सुरुवात व्यायामाने करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण व्यायामामुळे निरोगी राहण्यासह आपण स्वतःला ताजे तवाने अनुभवाल. परंतु आपल्या व्यस्त वेळापत्रकात आपल्याला व्यायाम करण्यासाठीच वेळ मिळत नसेल तर फक्त हे 5 योगांचा सराव करा. हे केल्यानं ते आपणास निरोगी ठेवू शकतात. तसेच, हे योगासन आपल्याला दिवसभराच्या कामासाठी शरीरात उत्साह आणि ऊर्जा देण्यास मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते योगासन.
 
1 सुखासन -
दररोज दोन ते तीन मिनिटे सुखसनाच्या आसनात बसून मेंदू शांत राखून दिवसभराच्या कामात एकाग्रता राहते. हे आसन करण्यासाठी जमिनीवर बसकट अंथरून पायाला दुमडून बसावं. कंबर आणि पाठ ताठ राखून हाताला गुढघ्यावर ठेवा. आता डोळे बंद करून शांत मनाने बसल्याने मेंदूची आणि मनाची एकाग्रता वाढते. 
 
2 आंजनेयासन - 
सरळ उभारून पाय पुढे ठेवून गुडघ्यांना दुमडून घ्या. या नंतर हातांना वर करून दोन्ही हात जोडून घ्या. हळू-हळू श्वास सोडल्यावर दोन्ही पायाने या क्रियेचा सराव दोन ते तीन मिनिटा पर्यंत करा.
 
3 भुजंगासन -
दररोज हे आसन केल्यानं फुफ्फुसे बळकट होतात. तसेच पचनशक्तीवर देखील याचा परिणाम पडतो. हे करण्यासाठी पोटावर झोपून हातांना कोपऱ्यापासून दुमडून आणा आणि हातावर शरीराचा सर्व भार टाकून मान उंच करा.
 
4 पवन मुक्तासन - 
बद्धकोष्ठता, गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास दूर करण्यासाठी हे आसन जणू वरदानच आहे. हे करण्यासाठी चटईवर सरळ झोपा. दोन्ही पाय 90 अंशाच्या कोणात दुमडून पोटाला लावा. नंतर गुडघ्यांना दोन्ही हाताने धरून चेहऱ्या पर्यंत न्या. दररोज या आसनाचा सराव किमान दोन ते तीन मिनिटे करावा.
 
5 वृक्षासन - 
सरळ उभारून दीर्घ श्वास घ्या. हाताला वर उचलून दोन्ही तळहातांना जोडून नमस्कार करा. डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवून उभे राहा. दीर्घ श्वास घ्या. ही प्रक्रिया दोन्ही पायाने पुन्हा करा. दररोजच्या नित्यक्रमात या आसनांना समाविष्ट केल्यानं आपण स्वतःला ताजे-तवाने अनुभवाल. तसेच शरीर आखडले असल्यास पाय आणि गुडघ्याच्या दुखण्यासह पचनाशी निगडित समस्या देखील दूर होतील.