शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (11:36 IST)

Bridge Pose कोणत्याही वयाचे लोक करु शकतात ब्रिज पोज योगाचा सराव, फायदे जाणून घ्या

Yoga
तंदुरुस्तीसाठी आरोग्य तज्ञ सर्व लोकांना शारीरिक हालचालींवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतात. बैठी जीवनशैली म्हणजेच निष्क्रियता हे सध्याच्या काळात झपाट्याने वाढत असलेल्या अनेक गंभीर आजारांचे प्रमुख कारण म्हणून पाहिले जाते. योगा-व्यायामाचा नित्यक्रमात समावेश केल्यास शारीरिक हालचाल आणि तंदुरुस्ती राखण्यास मदत होते. यासाठी तज्ञ सर्व लोकांना दररोज योगासने करण्याचा सल्ला देतात. यासाठी तुम्ही रोज ब्रिज पोज योगास अर्थात सेतुबंधासन योगाचा सराव करू शकता.
 
ब्रिज पोज बॅकबेंड म्हणून वर्गीकृत आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना या योगाचा सराव करून लाभ मिळू शकतो. कंबर-मणक्यापासून पाय-मांडीपर्यंत या योगाचा अभ्यास अत्यंत फायदेशीर मानला जातो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही राखण्यासाठी ब्रिज पोज हा तुमच्यासाठी उपयुक्त व्यायाम असू शकतो. चला जाणून घेऊया या योगाच्या पद्धती आणि त्याचे फायदे.
 
ब्रिज पोज अर्थातच सेतुबंधासन योग कसा करावा
सेतुबंधासन योग सोपा आहे, पण जर तुम्ही पहिल्यांदाच करणार असाल तर एखाद्या तज्ञाकडून नक्कीच समजून घ्या. काही परिस्थितींमध्ये हा योगाभ्यास न करण्याचाही सल्ला दिला जातो.

हा योग करण्यासाठी सर्वप्रथम चटईवर झोपावे. आपले पाय हळू हळू गुडघ्यातून वाकवा आणि नितंबांच्या जवळ आणा. आता कंबर जमिनीवरून शक्य तितकी उंच करा. या स्थितीत काही वेळ श्वास रोखून धरा आणि नंतर श्वास सोडताना पुन्हा पूर्वीच्या स्थितीत या.
 
ब्रिज पोज योगाचे फायदे
ब्रिज पोज योगाचा नियमित सराव शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही राखण्यासाठी, शरीराची क्रियाशीलता वाढवण्यासाठी आणि स्नायू आणि हाडे निरोगी ठेवण्यासाठी दररोज हा योग करण्याची सवय लावा.
पाठ, ग्लुट्स, पाय आणि घोट्याला बळकट करण्यासाठी.
छाती, हृदय आणि नितंबांचे स्नायू निरोगी ठेवण्यास मदत होते.
छाती, मान, खांदे आणि मणक्याचे स्ट्रेचिंग केले जाते, ज्यामुळे या अवयवांच्या वेदना कमी होऊ शकतात.
मन शांत करण्यास, तणाव आणि नैराश्याची लक्षणे नियंत्रित करण्यास मदत होते.
पोट, फुफ्फुस आणि थायरॉईड या अवयवांना उत्तेजित करतं.
 
ब्रिज पोज योग सावधगिरी
ब्रिज पोज योगाचा सराव खूप फायदेशीर मानला जातो, परंतु आदर्शपणे कोणत्याही योगासने सुरू करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ब्रिज पोझ योगाच्या संदर्भात ज्या लोकांना मानेला दुखापत किंवा दुखणे, पाठदुखी किंवा गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी त्याचा सराव टाळावा. याविषयी माहितीसाठी प्रथम एखाद्या विशेषज्ञचा सल्ला घ्या.
 
टीप: हा लेख योग तज्ञांच्या सल्ल्यानुसार तयार करण्यात आला असून आसनाची योग्य स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही विशेषज्ञांशी संपर्क साधू शकता.