शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (16:57 IST)

योगासन घालवतील पिंपल्स, तजेलदार दिसेल चेहरा

स्वच्छ आणि चमकदार त्वचा कोणालाही हवी हवीशी वाटते. पण एका वयात आल्यावर अनेकांना पिंपल्सचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे चेहर्‍यावरील चार्म नाहीसा होतो आणि यावर उपाय म्हणून तरुणी अनेक ब्युटी प्रॉडक्ट्सकडे आकर्षित होतात पण शेवटी मनाला पटणाणे परिणाम मिळत नाही अशात केवळ योगा करुन त्वचावरील या समस्येपासून सुटका मिळू शकतो-
 
सर्वांगासन
हे आसन पिंपल्स घालवण्यास मदत करतं. याने चेहर्‍याकडे रक्त परिसंचरण वाढतं. दिवसातून 3 ते 5 वेळा हे आसन केल्याने त्वचेवरील पुरळपासून सुटका मिळेल.
 
उत्थानासन
निरोगी त्वचेसाठी उत्थानासन अत्यंत उपयोगी योगासन आहे. याने त्वचेला ऑक्सिजनची आपूर्ती वाढते आणि अनके पोषक तत्त्व मिळतात. 
 
हलासन
हे आसन पचन ‍क्रियेसाठी योग्य असून त्वचेची चमक वाढविण्यासाठी आणि निरोगी त्वचा मिळविण्यासाठी मदत होते. जर आपल्याला पोटासंबंधी त्रास असेल तर त्याचा चेहर्‍यावर परिणाम दिसून येतो. अशात हे आसान फायदेशीर ठरेल.
 
मत्स्यासन
हे आसन थायरॉयड, पीनियल आणि पिट्यूटरी ग्रंथींच्या कार्यात सुधारणा करुन निरोगी त्वचेसाठी योग्य ठरतं. याने हार्मोन सामान्य होण्यास मदत होते. याने चेहरा आणि गळ्याच्या स्नायूंवर ताण येतो ज्याने डबल चिन पासून सुटका होण्यास मदत होते.
 
त्रिकोणासन
त्वचेवरील चमक मिळविण्यासाठी हा सर्वोत्तम योग आसन आहे ज्याने फुफ्फुस, छाती आणि हृदयचा योग्य व्यायाम होतो. याने त्वचेला चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन मिळते ज्याने त्वचा ताजीतवानी होते.