रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By
Last Updated : सोमवार, 2 मे 2022 (15:18 IST)

आहे "अक्षय तृतीये"चे पर्व पावन!!

akshay tritiya
जे काही कराल तुम्ही आज दिनी,
अक्षय फळ त्याचे,सुखाची पर्वणी.
होवो दान धर्म तुमच्या हातून,
सत्कर्म च घडते, बरं का ह्यातून,
लक्ष्मी ची कृपा आशीर्वाद मिळावा,
संत सेवेचा लाभ ही घडावा,
शुभ मुहूर्तावर करावी खरेदी,
शुभ शकुनाची असें ही नांदी,
पितरांच्या शांती ची करा प्रार्थना,
आशीर्वाद मिळे त्यांचा,द्या मानवंदना,
या मुहूर्ता ला मान असें फारच,
शुभमंगलची गर्दी ही होणारच,
घ्यावा लाभ तुम्ही ही सकळजन,
आज आहे "अक्षय तृतीये"चे पर्व पावन!!
...अश्विनी थत्ते