शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By

अक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चमत्कारी मंत्र

पौराणिक शास्त्रांप्रमाणे अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुर्हूत. या सर्वसिद्घ मुहूर्तावर प्रभू श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने इष्ट फळे प्राप्त होती. लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी हा दिवस सर्वात योग्य आहे. या दिवशी लक्ष्मीची आराधना केल्याने वर्षभर आर्थिक स्थिती चांगली राहते.
 
कशी करावी पूजा आणि मंत्र जप: 
 
अक्षय तृतीयेला संध्याकाळी उत्तरमुखी होऊन लाल आसानावर बसून देवीची उपासना केली जाते. पूजन सुरू करण्यापूर्वी लाल कपड्यावर देवी लक्ष्मीचा चित्र स्थापित करून त्यांच्या सन्मुख 10 लक्ष्मीकारक कौड्या ठेवून साजुक तुपाचा दिवा लावा. आता लक्ष्मीची षोडशोपचार पूजन करून प्रत्येक कौडीवर सिंदूर चढवावे आणि लाल चंदन माळने निम्न मंत्राची 5 वेळा माळ जपावी. या प्रकारे देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
 
लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष मंत्र: 
 
-  ॐ आध्य लक्ष्म्यै नम:
 
- ॐ विद्या लक्ष्म्यै नम:
 
-  ॐ सौभाग्य लक्ष्म्यै नम:
 
- ॐ अमृत लक्ष्म्यै नम:
 
-  ॐ पहिनी पक्षनेत्री पक्षमना लक्ष्मी दाहिनी वाच्छा भूत-प्रेत सर्वशत्रु हारिणी दर्जन मोहिनी रिद्धि सिद्धि कुरु-कुरु-स्वाहा।
 
या दिवशी श्री विष्णुसहस्त्रनामा पाठ करणेही फायदेशीर ठरतं आणि या मंत्रांनी व्यवसायात उन्नती व आर्थिक यश प्राप्त होतं.