अशी उभारावी गुढी..(बघा व्हिडिओ)
गुढी उभारण्यासाठी जी काठी वापरणार आहात ती स्वच्छ धुवून, पुसून घवी.
काठीला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे.
गुढीला कडुनिंबाची पाने, आंबच्या डहाळ बांधाव्यात, साखरेची माळ घालावी.
जिथे गुढी उभी करावाची आहे, ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.
आंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी व हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी.
या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. ब्रह्मध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करावी:
ब्रह्मध्वज नमस्ते स्तु सर्वाभीष्ट फलप्रद ।
प्राप्ते स्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ।।