बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2023
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (07:12 IST)

Ank Jyotish 17 ऑक्टोबर 2023 दैनिक अंक राशीफल,अंक भविष्य 17 october 2023 अंक ज्योतिष

numerology
मूलांक 1 -आजचा दिवस चांगला राहील. उच्च अधिकारी  खुश राहतील. प्रतिभा दाखवण्यासाठी  उत्तम संधी मिळतील.  जबाबदाऱ्या पार पाडा. वैवाहिक जीवन आनंदी राहील. मित्रांवर विश्वास ठेवा. आज कौटुंबिक आणि व्यवसायावर लक्ष केंद्रित करा.
 
मूलांक 2 -.आजचा दिवस सामान्य असेल. कामात हळूहळू यश मिळेल. लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. तथापि, आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणावरही लवकर विश्वास ठेवू नका. आज सावध राहून नम्रतेने वागावे. घाई करू नका
 
मूलांक 3  आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला राहील. योजना यशस्वी होतील. भागीदारी पुन्हा एकदा आकर्षित करेल. लाभ आणि प्रगती होईल. शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी काळ अनुकूल राहील. मार्गात येणारे अडथळे दूर होतील आणि  प्रगती होईल.
 
मूलांक 4 - आजचा दिवस चढ-उतारांचा असेल. कामात अडथळे येऊ शकतात, ज्यामुळे  मानसिक ताण येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या, अपघात होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
 
मूलांक 5 - आजचा दिवस यशाने भरलेला असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.  कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात नशीब साथ देईल. बिझनेस ट्रिपला जाण्याची योजना आखू शकता. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात अचानक लाभाची संधी मिळेल. 
 
मूलांक 6 -आजचा दिवस चांगला राहील. गुंतवणुकीचा लाभ मिळेल. प्रेम संबंध मधुर होतील आणि प्रियकरासोबत वेळ घालवाल. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. सध्या, रागावर नियंत्रण ठेवा आणि वाहन वापरताना काळजी घ्या. वाहन सावकाश चालवा.
. .
मूलांक 7 आजचा दिवस सामान्य असेल. आज शत्रूंवर विजय मिळवाल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील. विद्यार्थ्यांना आज संमिश्र परिणाम मिळू शकतात. वाद टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. पैसा येऊ शकतो.
 
मूलांक 8 -.आजचा दिवस मानसिक तणावाने भरलेला असेल. कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कोणताही निर्णय घेऊ नका, त्यामुळे नुकसान होऊ शकते.जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. आज छोट्या छोट्या गोष्टींवर रागावाल, स्वतःवर नियंत्रण ठेवा अन्यथा नुकसान होऊ शकते.
 
मूलांक 9 - आजचा दिवस आनंददायी असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. कठीण कामेही सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण करता येतील. व्यवसायात लाभाची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.
 




Edited by - Priya Dixit