CAA : सुमित्रा महाजनांसह भाजपचे अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात
मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये कलम 144 लागू असताना आंदोलन करणाऱ्या माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मध्य प्रदेशमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात भाजपने रॅली काढली होती.
या रॅलीमध्ये सुमित्रा महाजन यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंग, खासदार शंकर ललवानी, इंदूरच्या महापौर मालिनी सिंग हे सहभागी झाले होते. या सर्वांवर कलम 144 चे उल्लंघन केल्याचा आरोप करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेत त्यांना जिल्हा कारागृहात नेलं.