शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जून 2019 (11:23 IST)

मुंबईत पूर्वमोसमी पावसाची हजेरी, ढगाळ वातावरणामुळं बदलला विमानांचा मार्ग

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात सोमवारी संध्याकाळनंतर विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. मुसळधार पूर्वमोसमी पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे मंदगतीने धावत होती. बोरिवली आणि वांद्रे स्थानकादरम्यान पेंटाग्राफमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेवरही गाडय़ांच्या रांगा लागल्या होत्या.  
 
ढगाळ वातावरण आणि वीजांचा फटका छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक विमान सेवांनाही बसला. युनायटेड एअरलाइन्सचं न्यूयॉर्कहून मुंबईला येणारं विमान दिल्लीला वळविण्यात आलं तर गो एअरचं दिल्लीहून मुंबईला येणाऱं विमान अहमदाबादकडे वळवलं. हिंदुस्तान टाइम्सनं हे वृत्त दिलंय. इतर 22 विमानांचा मार्गही बदलण्यात आल्याची माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली.