मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 13 एप्रिल 2019 (10:26 IST)

मोदींनी 'सर्जिकल'चं श्रेय घेतल्यास काहीच गैर नाही - जी.डी. बक्षी

"1965च्या युध्दाचे श्रेय हे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना, तर 1971च्या युध्दाचे श्रेय हे इंदिरा गांधी यांना दिले जात असेल, तर सर्जिकल आणि एअर स्ट्राईकचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात काहीच चुकीचे नाही," असं मत सैन्याचे निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी व्यक्त केलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
 
जळगाव येथे एका कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.
 
ते म्हणाले, "सर्जिकल स्ट्राईक असो वा युध्द, या सर्व कारवाईसाठी पंतप्रधानांकडूनच परवानगी दिली जाते. त्यामुळे ही कारवाई करण्यासाठी हिंमत दाखविणाऱ्या कोणत्याही शासनाला श्रेय हे नक्कीच दिले पाहिजे."
 
"रफालमध्ये नोकरशाह आणि काही राजकारण्यांना यामध्ये पैसा मिळाला नाही, म्हणून रफालचा वाद निर्माण केला जात आहे. हा वाद पाकिस्तान व चीन सारख्या शत्रू देशांसाठी लाभदायक ठरत आहे," असं त्यांनी पुढे म्हटलं आहे.
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे.
 
'2019 वर्ल्ड लीडर ऑन फेसबुक' या अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजला 4.35 कोटी लाईक्स आहेत, तर त्यांच्याशी जोडलेल्या इतर पेजला जवळपास 1.37 कोटी लाईक्स आहेत.