शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (08:49 IST)

INDvsPAK : भारत-पाकिस्तान सामन्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

ट्वेन्टी-20 विश्वचषकात पाकिस्ताननं पहिल्याच सामान्यात भारताला पराभूत करत विजयी सलामी दिलीय.
 
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान जोडीने बिनबाद वादळी सलामीसह पाकिस्तानला 10 विकेट्सनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
 
पाकिस्तानचा कोणत्याही विश्वचषकात भारताविरुद्धचा हा पहिलाच विजय आहे. ट्वेन्टी20 प्रकारात 10 विकेट्सनी विजय मिळवण्याची पाकिस्तानची पहिलीच वेळ आहे.
सोशल मीडियावरील निवडक मीम्स आणि प्रतिक्रिया :
रविकांत यादव हे IAS अधिकारी आहेत. त्यांनी हे मीम शेअर केलं आहे.
आंदोलनजिवी फैजल खान या युजरनं भारताच्या 10 विकेट्सनं पराभवाबाबत विनोदी प्रतिक्रिया शेअर केलीय.
 
स्टँडअप कॉमेडीयन वरुण ग्रोव्हरनं भारत-पाकिस्तान सामन्यानंतर ही प्रतिक्रिया दिली 
 
विनय ढोकनिया हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी राजकीय टोलेबाजी या निमित्तानं केलीय.
कवी दुष्यंत कुमार यांच्या नावानं चालवल्या जाणाऱ्या ट्विटर अकाऊंटवरून दिनकर यांच्या ओळी शेअर करून भारतीय संघाला प्रोत्साहन दिलं आहे.
किरण नामक युजरनं क्रिकेटमधील या सकारात्मक क्षणाचा उल्लेख करत ट्वीट केलं आहे.


ESPN क्रिक इन्फोनं या सामन्याच्या शेवटी टिपलेला हा क्षण शेअर केलाय -