बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 30 एप्रिल 2019 (09:31 IST)

आतापर्यंत आपण मुघल, ब्रिटीश आणि इटालियन गुलाम होतो - कंगना रणावत

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान झालं. त्यावेळी मुंबईत मतदान केल्यानंतर कंगना म्हणाल्या की, "हा दिवस (मतदानाचा) महत्त्वाचा आहे आणि तो पाच वर्षांतून एकदा येतो. या दिवसाचा पूरेपूर वापर करा. मला वाटतं की भारत आता खरा स्वतंत्र होत आहे. यापूर्वी आपण कधी मुघल कधी ब्रिटीश तर कधी इटालियन सरकारचे गुलाम होतो. म्हणून आता आपल्या स्वातंत्र्याने दिलेला हक्क जरूर बजावा."  
 
"आपला देश याआधीही गुलामगिरीतच होता. आपले नेते लंडनमध्ये आराम करत राहायचे. काँग्रेसच्या काळात गरीबी, प्रदूषणामुळे देशाची दुर्दशा झाली. यापेक्षा वाईट अवस्था होऊ शकत नाही. आता आपल्या स्वराज्य आणि स्वधर्माची वेळ आली आहे. आपल्याला मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करायला हवं," असंही त्या म्हणाल्या.
 
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदानासह महाराष्ट्रातील मतदान सोमवारी संपलं. राज्यात यंदा एकूण मतदान 60.68 टक्के झालं.
 
याशिवाय देशभरातील 72 जागांवर चौथ्या टप्प्यात मतदान पार पडलं. अजूनही तीन टप्प्यांचं मतदान बाकी आहे.