रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मे 2018 (11:31 IST)

सहल केरळची

अरबी समुद्र, पश्चिम घाट यांच्यामध्ये विसावलेल्या केरळची सृष्टी सौंदर्याबद्दल ख्याती आहे. पर्यटन स्थळामध्ये केरळने उच्चस्थान पटकावले आहे.
 
केरळ म्हणजे नारळाच्या हिरवगार बागा, फेसाळलेले सागरकिनारे आणि कोरीव शिल्पांची पुरातन मंदिरे या गोष्टी प्रेक्षणीय आहेत. या सर्व एव्हरग्रीन केरळच्या पॉप्युलर, प्रीमियम आणि ऑफबीट टूर्स पर्यटक कधीच विसरणार नाहीत. त्या त्या ठिकाणाप्राणे उत्तोत्तम हॉटेल्सही समाविष्ट आहेत.
 
यामध्ये मुन्नारधील फोर्ट मुन्नार हॉटेल सिल्व्हर टिप्स, हॉटेल क्लाउड व्हॅली, हॉटेल ऑर्चिड हायलॅडस, कोचीनमधील गोकुलम् पार्क, द मर्सी, कुमारकोममधील लेक सॉग, टेकाडी येथील अरण्या निवास, एलिफंट रूट रिसॉर्ट, स्पाइस ग्रोव्ह, कोवलमचे समुद्रा हॉटेल, पुवर येथील पुवर आयलंड, कन्यामुकारी येथील स्पर्श रिसॉर्ट, सीशोर रिसॉर्ट, त्रिवेंद्रममधील एस. पी. ग्रँड डेज, द रेसिडेन्सी टॉवर, अल्लेपीमधील हवेली रिसॉर्ट अशी अनेक हॉटेल्स आहेत. कोचीन, कुमारकोम, कोवालम्, मुन्नार ही केरळमधील प्रीमियम डेस्टिनेशन्स, बॅकवॉटरवर वसलेले छोटेसे बेट कुमारकोमल जेथे गेल्यावर आयलँड गेल्याचा भास होतो तर कोवाल हे एक सुंदर असे बीच डेस्टिनेशन आहे.
अशा प्रीमियम केरळची सुरूवातच कोचीनमधील केरळचा सांस्कृतिक नजराणा, कथकल्ली नृत्याच्या लाइव्ह परफॉर्मन्सने होते. त्यानंतर हार्बर क्रूझ राईडमधून फिरताना चायनीज फिशिंग नेटचा अप्रतिम नजारा पाहता येतो. कोचीनच्या ताज मलबार या लक्झुरियस हॉटेलमधील लंचचा स्वाद सदैव जिभेवर तरळतो. केरळमध्ये निसर्गाचे वैविध्य लाभलेली अनेक ऑफ बीट डेस्टिनेशन्स आहेत. त्यातील एक म्हणजे पुवर! एक सिनिक ब्युटी म्हणून पुवर बीच प्रसिद्ध आहे. मनमोहक बीच, सदाबहार वनराई, हिरवेगार चहाचे मळे, उंचच उंच नारळ आणि ताडाची झाडे, निळाशार समुद्र यामुळे पर्यटक बाराही महिने येत असतात.