अनुभवा रोपवेची धमाल

Last Modified मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (16:58 IST)
दोस्तांनो, यंदाच्या हिवाळ्यात निसर्गाच्या जवळ जायचं आहे? तेही हटके अंदाजात? मग तुम्ही रोप वेचा पर्याय निवडू शकता. भारतातल्या अनेक ठिकाणचे रोप वे प्रसिद्ध आहेत. आसपासचा दर निसर्ग, सूर्यास्त यांचं रोप वेमधून उंचावरून दर्शन घडतं. ट्रेकिंग, कार किंवा बाईक राईड हे निसर्गदर्शनाचे काही पर्याय असले तरी रोप वे काहीतरी वेगळं देऊन जातो. त्यातच थोडं धाडस केल्याचं समाधानही लाभतं. भारतातल्या प्रसिद्ध रोप वेंची ही माहिती.
* दार्जिलिंग हे निसर्गरम्य ठिकाण मानलं जातं. इथलं घनदाट जंगल, उंच पर्वतरांगा, चहाचे मळे, धबधबे आणि ना बघून मन मोहून जातं. हे सगळं उंचीवरून पाहण्याची मजा काही औरच. म्हणूनच 1968 साली इथे रोप वे सुरू करण्यात आला. या रोप वे मधून हिमालयाचं सुंदर
दर्शन घडतं.
* काश्मीरमधलं निसर्गसौंदर्य सुहास साळुंखे अनुभवायचं असेल तर गुलमर्गला जायला हवं. गुलमर्गचा रोप वे जगातला दुसर्याल क्रमांकाचा सर्वात उंच रोप वे आहे. या रोप वेमधून काश्मीर डोळ्यात साठवून घेता येतं.
* महाराष्ट्रातल्या रायगडमधला रोप वेही प्र्रसिद्ध आहे. या रोप वेच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर जाता येतं. हा रोपवे तुमच्या
बजेटमध्ये बसू शकतो. यासोबतच रायगडच्या आसपासची पर्यटन स्थळंही तुम्ही पाहू शकता.
* उत्तराखंडमधल्या देहरादूनमधलं मसुरी हे थंड हवेचं ठिकाण प्रसिद्ध आहे. इथल्या गन हिलमध्ये रोप वे आहे. या रोप वे मधून मसुरी खूप छान दिसतं. मसुरीमधली इतर ठिकाणंही तुम्ही बघू शकता.
* मनालीमधलं सोलंग हे खोरं म्हणजे निसर्गसौंदर्यांचा खजिना. हिमालयाचा सुंदर नजारा तुम्हाला आकर्षित करेल. या ठिकाणी तुम्ही विविध प्रकारचे धाडसी क्रीडाप्रकारही करू शकता. इथल्या रोप वेने माउंट फट्रूपर्यंत जाऊ शकता.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

नवऱ्याची २१ कर्तव्ये

नवऱ्याची २१ कर्तव्ये
०१. कुकरखालचा गॅस तीन शिट्यांनंतर बंद करणे. ०२. उतू जाणाऱ्या दूधाखालचा गॅस धावत जाऊन ...

Kamal Hassan Health Bulletin: कमल हसन हॉस्पिटलमध्ये दाखल, ...

Kamal Hassan Health Bulletin: कमल हसन हॉस्पिटलमध्ये दाखल, पायाच्या हाडामध्ये झाले होते इन्फेक्शन
अभिनेता-राजकारणी कमल हसन यांना रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करावी ...

"लॉकडाऊन" ने किमया केली बरे !!

चिन्मयचे पप्पा : (आनंदाने) अगं, आपल्या चिन्मयचा फोन आलाय. सुनबाईला दिवस गेलेत. आपण आजी- ...

रेल्वे रस्त्यावर धावली तर

रेल्वे रस्त्यावर धावली तर
बाबा झम्प्या ला - झम्प्या सांग की रेल येते तेव्हा रस्त्याचे फाटक का बंद करतात

पिंट्याचा प्रवास

पिंट्याचा प्रवास
पिंट्या - प्रवास करून आल्यावर