शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीएमसी चुनाव 2022
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (21:14 IST)

कल्याण डोंबिवली जागेवर भाजपने दावा केल्याची माहिती नाही - एकनाथ शिंदे

eknath shinde
कल्याण-डोंबिवली लोकसभेच्या जागेवर भारतीय जनता पक्षाने दावा केल्याची मला माहिती नाही. मात्र यापुढील सर्व निवडणुका भाजप-शिवसेना युती म्हणून लढविणार आहे. भाजप नेते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी तसे जाहीर केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
 
एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह काही प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना भेट दिली. अभिनेता नाना पाटेकर यांच्या डोणजे येथील निवासस्थानी जाऊन गणेश दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
 
भाजपच्या ताब्यात नसलेल्या पण पक्षाला अनुकूल असलेल्या आणि शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला असलेला कल्याण लोकसभा मतदार संघांत कमळ फुलविण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने केला आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत कल्याण-डोंबिवली मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. भाजपने या जागेवर दावा केल्याबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी त्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.