1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 10 सप्टेंबर 2016 (10:16 IST)

पीकूसाठी दीपिकापेक्षा कमी मानधन मिळाले

बिग बी अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी पिंक चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यग्र आहेत. त्याचवेळी त्यांना बॉलिवूड इंडस्ट्रीमधील तुम्हाला हैराण करणारी एखादी गोष्ट सांगा असे विचारले गेले असता एका क्षणात त्यांनी पीकू चित्रपटासाठी दीपिकापेक्षा मला कमी मानधन मिळाले असे सांगितले. अर्थात याचे स्पष्टीकरणही त्यानी लगेच दिले. अमिताभ म्हणाले यासाठी दोन कारणे असू शकतात. एकतर दीपिका या चित्रपटात नक्कीच महत्त्वपूर्ण होती व दुसरे म्हणजे मी माझे प्राईज टॅग कदाचित घालविले आहे. दीर्घ काळ मी इंडस्ट्रीत आहे व त्यामुळेच कदाचित मी तितकासा महत्त्वपूर्ण राहिलेलो नाही. अर्थात या बातमीने अमिताभ यांचे ङ्खॅन थोडे नाराज झाले असले तरी दीपिकाने बॉलिवूडमधील तमाम नायिकांना मागे टाकत कमाईत टॉप पोझिशन गाठलेली आहे हेही तितकेच सत्य आहे.