1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑक्टोबर 2016 (13:43 IST)

‘कॉन्ड नास्ट’मासिकाच्या फोटोमुळे प्रियांका चर्चेत

प्रियांका चोप्रा कॉन्ड नास्ट मासिकातील फोटोमुळे सध्या चर्चेत आली आहे. यात मासिकातील फोटोमध्ये प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा टि शर्ट परिधान केला आहे. या टी-शर्टवर लिहलेल्या रेफ्यूजी, इमिग्रेशन, आउटसाइडर, ट्रॅव्हलर या चार शब्दांमुळे चाहत्यांनी प्रियांकाच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. या चार शब्दांमधील तीन शब्दांना लाल रंगाने खोडले असून ट्रॅव्हलर या शब्दाला तसेच ठेवण्यात आले आहे. या चार शब्दांचा अर्थ लावला तर पहिला शब्द निर्वासित, दुसरा शब्द अप्रवासी आणि तिसरा शब्द बाहेरुन आलेला असा होतो. तर छेडछाड न करता ट्रॅव्हलर हा शब्द तसाच ठेवण्यात आला असून, त्याचा अर्थ इकडे तिकडे भटकत राहणारा अर्थात प्रवासी असा होता. या चार शब्दांचा नेटीझन्स आपापल्या परिने अर्थ लावत असून प्रियांकाला यातून काय संदेश द्यायचा आहे, याबद्दल विचारणा करत आहेत.