बुधवार, 28 सप्टेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (14:49 IST)

अभिनेत्री सोमी अलीने अभिनेता सलमान खानवर केले हे गंभीर आरोप

बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. अभिनेत्री सोमी अलीने केलेल्या आरोपांमुळे सलमान पुन्हा चर्चेत आला आहे. पुन्हा एकदा सोमी अलीने सलमान खानचे नाव न घेता आरोप केला आहे. मैने प्यार कियाचे पोस्टर शेअर करत सोमीने लिहिले की, हा माणूस महिलांना मारहाण करतो, त्याची पूजा करणे बंद करा. सोमीची ही पोस्ट सध्या विशेष चर्चेत आली आहे. सोमी ही सलमानची माजी गर्लफ्रेंड असल्याचे सांगितले जाते.
 
सोमी अलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोमीच्या या पोस्टमध्ये तिने मैंने प्यार किया या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये भाग्यश्री सलमान खानसोबत दिसत आहे. फोटोसोबत सोमीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ज्याने महिलांना मारहाण केली आणि फक्त मलाच नाही तर इतर अनेकांना मारहाण केली. कृपया त्याची पूजा करणे बंद करा. तो मानसिक आजारी आहे. ज्या अकाऊंटवरून हे पोस्ट करण्यात आले आहे ते व्हेरिफाईड झालेले नाही, पण ते सोमीचे खरे इन्स्टा अकाउंट असल्याचे सांगितले जात आहे.
 
सोमीने या पोस्टमध्ये फक्त पोस्टर शेअर केले आहे, कॅप्शनमध्ये तिने कोणाचेही नाव लिहिलेले नाही, याआधीही सोमीने सलमानवर अनेकदा आरोप केले असले तरी यावेळीही तिने सलमानचा उल्लेख केला नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सोमीने या इन्स्टा पोस्टमध्ये कमेंट्स मर्यादित ठेवल्या आहेत, म्हणजेच प्रत्येक जण तिच्या या पोस्टवर कमेंट करू शकत नाही.
 
सोमीने सलमान खानचे नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सोमीने अनेकदा असे केले आहे. मार्चमध्ये सोमीने सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटाचा सिलआऊट फोटो शेअर केला आणि लिहिले, ‘बॉलिवुडचा हार्वे विन्स्टन. तुम्ही एक दिवस उघड व्हाल. तुम्ही ज्या महिलांचे शोषण केले आहे, ते एक दिवस बाहेर येईलच. आणि त्यांचे सत्य सांगतील, जसे ऐश्वर्या राय…’ सोमीने तिच्या पोस्टमध्ये ऐश्वर्याला टॅगही केले आहे. रिलेशनशिप दरम्यान सेटवर सलमान खानने ऐश्वर्या रायला मारहाण केल्याचा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.
 
सोमी अलीने काही मुलाखतींमध्ये दावा केला आहे की, ती सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. परंतु अभिनेत्याने तिची फसवणूक केली. सोमीने सांगितले की, ती तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. ती आता सलमानशी बोलत नाही. सोमी अलीने याआधी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, ती फक्त सलमान खानसोबत लग्न करण्यासाठी भारतात आली होती. ती १९९१ ते १९९८ या काळात हिंदी चित्रपटांमध्ये दिसली. १९९९ मध्ये सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती अमेरिकेत गेली. तर, बुलंद नावाच्या चित्रपटात सलमान आणि सोमी यांनी एकत्र काम केले. मात्र, हा चित्रपट काही कारणामुळे प्रदर्शित झालेला नाही.