रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 10 जून 2019 (11:47 IST)

एक्ट्रेस यामी गौतमला जॅकी चेनकडून मिळाली ही भेटवस्तू

चीनमध्ये चित्रपट 'काबिल'च्या प्रमोशन दरम्यान चित्रपटाची अभिनेत्री यामी गौतमला आंतरराष्ट्रीय आयकॉन जॅकी चेनने भेट म्हणून एक पारंपरिक शॉल दिली आहे ज्यामुळे यामी फारच खूश आहे. 
 
यामीने एका विधानात म्हटले, मला फार आश्चर्य झाला जेव्हा मी हे ऐकले की मिस्टर चेनने माझ्यासाठी भेटवस्तू पाठवली आहे. मी त्यांना भेटू शकले नाही कारण त्या वेळेस मी भारतात 'बाला'ची शूटिंग करत होते, पण जेव्हा मी बीजिंग गेले, त्यांच्याकडून मला एक पार्सल मिळाला. त्यांची ही भेटवस्तू मला पाठवणे हे त्यांचे उदार होण्याचे दर्शवते. 
 
यामीने पढे म्हटले की आम्ही बालपणापासूनच त्यांचे चित्रपटबघून मोठे झालो आहेत आणि मी त्यांच्या कामाची फार मोठी फॅन होते. ते एक आयकॉन आणि लेजेंड आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की मी लवकरच त्यांची भेट घेईन. 
नुकतेच यामी आणि हृत्विक रोशन बीजिंगमध्ये होते आणि त्यांना तेथे त्यांच्या चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिक्रिया मिळाली. हृ‍त्विक, जॅकी चेनला भेटला होता आणि त्याने त्यांच्या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर शेयर केले होते.