शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 11 एप्रिल 2021 (12:04 IST)

तुमच्यासोबतही हे असं घडत असेल ना? असं दु:खी मनाने विचारत आहे जेनेलिया

जेनेलिया देशमुख बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावरील ती नेहमी अॅक्टिव्ह दिसते. तिचे खूप फॅन्स आहे आणि तिचे व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. मस्तीचे व्हिडीओ शेअर करणाऱ्या जेनेलियानं काही वेगळाच व्हिडीओ शेअर केल्यामुळे मात्र चाहते काळजीत पडले आहे. आता तिच्या फॅन्सने रितेशला प्रश्न विचारायला सुरु केलं आहे.
 
जेनेलियानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात जेनेलिया चेहऱ्यावर दुःखी भाव असून 'वेडी आहे मी, कारण तू पुन्हा माझ्या मेसेजचं उत्तर आठ तासांनी देणार आणि मी फक्त आठ सेकंदात.' जेनेलियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये जेनेलियानं लिहिलं, 'कधी कधी तुमच्यासोबतही हे असं घडत असेल ना?' 
 
आता चाहत्यांना रुखरुख लागली आहे की नेमकं झालं तरी काय ज्यामुळे जेनेलिया दु:खी आहे. अशात चाहत्यांनी रितेशला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.