सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (17:48 IST)

'पावरी' हो रही है : पाकिस्तानी गर्लने भारताचे मानले आभार

पावरी शब्दामुळे फेमस झालेल्या पाकिस्तानी गर्लने भारताचे मानले आभार 
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नाते कसेही असले तरी पाकिस्तानाच्या अनेक कलाकरांनी बॉलीवुड चित्रपटांमध्ये काम करुन जगात खूप नाव कमावले आहेत. अलीकडेच पाकिस्तानची एक सामान्य मुलगी जगभरात प्रसिद्ध झाली आहे. या सुंदर मुलीचं नाव दानानीर मोबीन उर्फ गीना असे आहे. जाणून घ्या ही का इतकी प्रसिद्ध झाली ते - 
 
'हमारी पावरी हो रही है' व्हिडिओमुळे व्हायरल झालेल्या पाकिस्तानी गर्ल दादानीरने 6 फेब्रुवारी रोजी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. तिचा हा व्हिडिओ भारतात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि ती हिट झाली. व्हिडिओत ती वेळग्या शैलीत पार्टीला पावरी म्हणत असल्यामुळे फेमस झाली. या व्हिडिओत तिच्यासोबत फ्रेंड्स दिसत आहे. ज्यात ती पार्टीला पावरी म्हणत आहे. व्हिडिओ उत्तरी पाकिस्तानच्या नथाईगली येथील टेकडीवर शूट करण्यात आला आहे. 
 
व्हिडिओवर आतापर्यंत अनेक मीम्स बनले आहेत. बॉलीवूड स्टार आणि अनेक क्षेत्रातील सेलीब्रिटीजने देखील यावर मीम तयार करुन शेअर केले आहेत. अमूल कंपनीने देखील यावर मीम तयार केले असून त्यावर 'ये हमारी पाव टी हो रही है' असे लिहिले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dananeer |