रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (00:18 IST)

'कथानायकुडू' चा फर्स्ट लूक

एनटीआर यांच्या बायोपिकमध्ये श्रीदेवी यांची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी अभिनेत्री रकुलप्रीत सिंग हिची निवड झाली असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटातील फर्स्ट लूक तिने सर्वांच्याच भेटीला आणला आहे. 'कथानायकुडू' Kathanayakudu असं या चित्रपटाचं नाव असून, त्यातील रकुलप्रीतचा लूक अत्यंत लक्षवेधी ठरत आहे. 
 
प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रीदेवी यांच्या तरुणपणीची व्य़क्तीरेखा रकुल साकारत असल्यामुळे तिच्या लूकमधून स्पष्ट होत आहे. मुख्य म्हणजे 'श्री'चा लूक साकारताना त्यात बरेच बारकावे टीपण्यात आल्याचंही लक्षात येतंय. हिंद चित्रपटविश्वात पहिल्या महिला सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्रीदेवी यांची व्यक्तीरेखा साकारणं ही आपल्यासाठी आतापर्यंतची सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचं खुद्द रकुलप्रीतने सांगितल आहे.