सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 मार्च 2020 (11:43 IST)

हा चित्रपट ठरेल माझ्या करियरमधील टर्निंग पॉइंट : नोरा फतेही

वर्षाची सुरूवात स्ट्रीट डान्सर थ्रीडी चित्रपटाने केल्यानंतर आता अभिनेत्री व डान्सर नोरा फतेही आगामी चित्रपट भुजः द प्राइड ऑफ इंडियामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात ती गुप्तहेरची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १९७१ सालातील भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळावर आधारीत आहे. या चित्रपटातील एक्शन सीनसाठी नोराने मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये ट्रेनिंग घेतले आहे.
 
नोराने स्ट्रीट डान्सर थ्रीडी चित्रपटातून खूप काही शिकायला मिळाल्याचं सांगितलं. मात्र एक डान्सर म्हणून आपली छाप उमटविल्यानंतर आता तिला अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. 
साचेबद्ध काम करणं कलाकाराच्या प्रगतीमध्ये अडचण ठरते. वेगवेगळ्या गोष्टी व भूमिका केल्यानंतर लोकांच्या मनातून साचेबद्ध अभिनेत्रीची इमेज निघून जाईल. सध्या गोष्टी बदलत असल्याचं नोरा सांगत होती.