उर्वशी राज ठाकरे आता असिस्टंट डिरेक्टर
राज ठाकरे यांची मुलगी उर्वशीने काही दिवसांपूर्वी फॅशन इंडस्ट्रीत एन्ट्री केली. आता डेव्हिड धवनच्या आगामी सिनेमासाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून उर्वशी सध्या काम पाहतेय.
या सिनेमात वरूण धवन मुख्य भूमिकेत आहे तर रोहित धवन हा सिनेमा दिग्दर्शित करतोय. हा सिनेमा जुडवाचा सिक्वेल असून 29 सप्टेंबरला रिलीज होतोय.खरं तर राज ठाकरेंचं सिनेमाविषयीचं प्रेम सर्वश्रृतच आहे.पण आता ते पूर्ण करण्याचं काम त्यांची मुलगी उर्वशी करतेय.