Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 29 फेब्रुवारी 2008 (16:49 IST)
अर्थमंत्र्यांचे 'काव्य'
अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी अगदी नेहमी प्रमाणे प्रसिद्ध तामीळ संत तिरुवल्लुर यांच्या काव्यपंक्तींनी आपल्या अर्थसंकल्प वाचनाचा शेवट केला.तामीळ भाषेतील काही काव्यपंक्तीही त्यांनी यावेळी संसदेत सादर केल्या.
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेवटी चिदंबरम म्हणाले की, साधारण दोन हजार वर्षांपूर्वी महान संत तिरुवल्लुर यांनी चांगल्या प्रशानाविषयीची व्याख्या केली होती, याच ओळी मी आज पुन्हा एकदा आपल्यापुढे सादर करत आहे.
'उदारीकरण हे चांगले शासन समजले जाते तसेच, तळागाळातील लोकांविषयची सहानुभूती हे उत्कृष्ट प्रशासन मानले जाते.' हा विचार घेऊन चालल्यास आपण योग्य प्रशासन करू शकू असा सल्लाही त्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना दिला.