बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. बजेट 09
Written By वार्ता|

जीवनरक्षक औषधे स्वस्त होणार

काही जीवनरक्षक औषधे आता स्वस्त होतील. अर्थमंत्र्यांनी आज या औषधांवरील सीमा शुल्कात सवलत देण्याचे जाहिर केले. इन्फ्लुएंझा लसीकरण, स्तन कॅन्सर, रूमेटिक आर्थरायटिस आदींवरील उपचारांसाठीची ही औषधे आहेत. यावरील सीमाशुल्क दहावरून पाच टक्के करण्यात आले आहे. यावर उत्पादन शुल्कही लागणार नाही. ह्रदयावरील उपचारात महत्त्वची ठरणारी दोन मशिन्सवरीलही सीमा शुल्क ७.५ टक्के कमी करून पाच टक्क्यावंर आणले आहे.