गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (16:53 IST)

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करिअर टिप्स

1 प्राध्यापकांचे ऐका-आपण आपल्या व्यावसायिक पदवी दरम्यान, आपल्या प्राध्यापकांना समजून घेतो की ते कशाबद्दल बोलतं आहे.ते लक्ष देऊन ऐका, समजून घ्या,ते जे काही सूचना देत असतील त्यांचे अनुसरण करा.त्यांच्या कडे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उत्तम कारकिर्दीचे टिप्स असतात.कारण ते बऱ्याच विद्यार्थ्यांच्या समस्येचे समाधान करतात.त्यांच्या सल्ल्यानुसार काम केल्याने आपल्याला यश नक्की मिळेल.म्हणून नेहमी आपल्या प्राध्यापकांचे ऐकावे.
 
2 इंटर्नशिप करून व्यावसायिक अनुभव मिळवा- कॉलेज दरम्यान आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून नवीन कौशल्ये शिकून आपल्या भविष्याचे मार्ग मोकळे करतात.इंटर्नशिप केल्याने व्यावसायिक अनुभव मिळू शकतो.आपल्याला हे समजते की कॉर्पोरेट जगात कसे वावरतात?एखाद्या मोठ्या कंपनीत काम कसे करायचे ?नोकरीची वास्तविकता जाणून घेण्यासाठी आपल्या क्षेत्राची निवड करता येईल.
 
3 आपल्याला काय आवडत नाही याचा विचार करा-आपल्या शाळा आणि महाविद्यालयीन काळात आपला एखादा नावडीचा विषय असल्यास आपण काय करायचे आहे ते ठरवा.आपल्या आवडीचा विषय निवडून त्या क्षेत्रात चांगले काम करा.
 
4  स्वतःचे ऐका- बरेच विद्यार्थी कॉलेजात जातात कारण त्यांना पदवी त्यांनी निवडल्या विषयाचा अभ्यास करून मिळवायची असते.असं नाही,पदवी दरम्यान बरेच विषय असतात आणि विषयाशी निगडित बरेच प्रकारचे काम करावे लागतात.ते काम करताना अडथळा देखील येतो.म्हणून आपण आपल्या मनाचे ऐकून आपल्या इच्छेच्या विषयाची निवड करा.जेणे करून आपल्याला पुढे काहीच त्रास होऊ नये.
 
5  बाहेर जाऊन दुसरी भाषा शिका- बऱ्याच वेळा कॉलेजातून  इंटर्नशिप करण्यासाठी परदेशात जाण्याची संधी मिळते,ही संधी  अजिबात गमावू नका.जेव्हा आपण दुसर्‍या देशात असता तेव्हा आपण त्यांची संस्कृती, भाषा यासह अनेक आव्हाने सोडविण्यास तज्ञ होता.आज जग बदलत आहे. या स्पर्धेच्या युगात आपण काही वेगळे शिकता तर हे आपल्या पुढल्या करिअरच्या दृष्टीने करिअर उंचावर नेण्यासाठी सोपे होऊ शकते.
 
6 वास्तवाशी परिचित व्हा -आपण करिअर पुढल्या शिक्षणात करू इच्छित असाल तर पोस्ट ग्रॅज्युएशन बद्दल माहिती मिळवा.अन्यथा आपण ग्रॅज्युएशन करून देखील चांगले कमावू शकता.
 
7 अलीकडील पदवीधरांशी बोला-प्रत्येक वर्षी आपल्या कॉलेजातून पदवीधर आणि पदव्युत्तर झालेले अनेक विध्यार्थी बाहेर पडतात. त्यांच्या कडून  पुढच्या करिअरच्या दृष्टीने काही टिप्स घ्या,माहिती मिळवा. कारण आपल्याला ज्या क्षेत्रात जायचे आहे,त्याच्या बद्दल एखादा अनुभवी विद्यार्थी जास्त चांगले सांगू शकतो.