उत्कृष्ट करिअरसाठी बारावी सायन्स नंतर हा कोर्स करा

Last Modified शुक्रवार, 11 जून 2021 (17:33 IST)
इयत्ता दहावी आणि बारावी पर्यंत सायन्स विषय घेतल्या नंतर इंजिनियर ,डॉक्टरच नव्हे तर सायंटिस्ट देखील बनू शकता. जर आपली आवड रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये असल्यास तर हे काही कोर्स करून आपण चांगले करिअर बनवू शकता.
सायन्स किंवा विज्ञान स्ट्रीम मध्ये एक दोन नव्हे तर बरेच पर्याय आहे. त्यापैकी काही पर्याय सांगत आहोत.
1 नॅनोटेक्नोलॉजी- बारावीनंतर नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये बीएससी किंवा बीटेक आणि त्यानंतर त्याच विषयातील एमएससी किंवा एमटेक करून या क्षेत्रात उत्तम करियर बनवू शकता.

2 स्पेस सायन्स-हे विज्ञानाचे खूप विस्तृत क्षेत्र आहे. या अंतर्गत कॉस्मॉलॉजी,स्टेलर सायन्स ,प्लॅनेटरी सायन्स ,ऍस्ट्रॉनॉमी अशी अनेक क्षेत्रे येतात. यामध्ये तीन वर्ष बीएससी आणि चार वर्षे बीटेक ते पीएचडी पर्यंतचे अभ्यासक्रम विशेषतः बंगलोरमध्ये असलेल्या इस्रो आणि आयआयएससी (IISC)मध्ये घेतले जातात.
3 -अ‍ॅस्ट्रोफिजिक्स -जर आपण तारका आणि अवकाशगंगेत आवड ठेवता तर बारावी नंतर आपण अ‍ॅस्ट्रोफिजिक्स मध्ये करिअर बनवू शकता.या साठी आपण एमएससी फिजिकल सायन्स मध्ये आणि बी एस सी फिजिक्स मध्ये करू शकता.अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये
डॉक्टरेट केल्यावर विद्यार्थी इस्रोसारख्या संशोधन संस्थांमध्ये वैज्ञानिक होऊ शकतात.

4 एन्व्हायर्नमेंटल सायन्स-या क्षेत्रात मानवी क्रियांचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला जातो.या अंतर्गत इकॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट,वाईल्डलाईफ मॅनेजमेंट,पोल्युशन कंट्रोल,सारखे विषय शिकवले जातात.या सर्व विषयात एनजीओ आणि यूएनओ चे प्रकल्प वेगाने वाढत आहे.अशा परिस्थितीत नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील.
5 वॉटर सायन्स-हे पाण्याच्या पृष्ठभागाशी संबंधित विज्ञान आहे. यामध्ये हायड्रोमेटिओलॉजी, हायड्रोजीओलॉजी, ड्रेनेज बेसिन मॅनेजमेंट, वॉटर क्वालिटी मॅनेजमेंट, हायड्रॉइनफॉर्मॅटिक्स या विषयांचा अभ्यास करावा लागेल. हिमस्खलन आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता या क्षेत्रातील संशोधकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

6 मायक्रो बायोलॉजी -या क्षेत्रात प्रवेश साठी आपण लाईफ सायन्स मध्ये बीएससी किंवा मायक्रो बायोलॉजी मध्ये बीएससी करू शकता. या नंतर मास्टर डिग्री आणि पीएचडी देखील पर्याय आहे.या व्यतिरिक्त आपण पेरॉमेडिकल,मरीन बायोलॉजी,बिहेव्हियरल सायन्स, फिशरीज सायन्स अशा अनेक क्षेत्रात विज्ञानाची आवड ठेवणारे आपले उत्तम करिअर करू शकतात.

7 डेयरीसायन्स-दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात भारत एक महत्वाचा देश आहे. दुग्ध उत्पादनात भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. डेयरी टेक्नॉलॉजी किंवा डेयरी सायन्स अंतर्गत दुग्ध उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग, साठा आणि वितरण याविषयी माहिती दिली जाते. भारतातील दुधाचा वापर पाहता या क्षेत्रात प्रशिक्षित व्यावसायिकांची मागणी वाढत आहे. विज्ञान विषयासह वी उत्तीर्ण झाल्यानंतर स्टुडन्ट ऑल इंडिया आधारावर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चार वर्षांच्या पदवीधरडेअरी टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. काही संस्था दुग्ध तंत्रज्ञानाचा दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स देखील देतात.

8 रोबोटिक सायन्स- रोबोटिक सायन्सचे क्षेत्र अतिशय वेगाने वाढत आहे.या विषयाचा वापर सर्व क्षेत्रात होत आहे.जसे की हृदय शस्त्रक्रिया, कार असेंब्लींग, लँडमाइन्स.आपल्याला या क्षेत्रात करिअर करायचे असल्यास,आपण या क्षेत्राशी संबंधित काही स्पेशलायझेशन कोर्स देखील करू शकता.जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स सिस्टम, कॉम्प्युटर सायन्स मधून पदवी घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला योग्य असतात.रोबोटिक मध्ये एमईची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या नामांकित संस्थेत संशोधन कार्यात नोकरी मिळू शकते.यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

रिकाम्या पोटी या गोष्टी खाणे टाळा, अनेक आजारांचे बळी असू ...

रिकाम्या पोटी या गोष्टी खाणे टाळा, अनेक आजारांचे बळी असू शकतात
आपल्या आरोग्यासाठी अन्न किती महत्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्याच वेळी, आपण ...

भजी कुरकुरीत होतील, बेसनाचं मिश्रण तयार करताना या टिप्स ...

भजी कुरकुरीत होतील, बेसनाचं मिश्रण तयार करताना या टिप्स अमलात आणा
पावसाळी संध्याकाळ असो किंवा हिवाळ्याची सकाळ, चहासोबत बेसनाचे कुरकुरीत भजी सर्वांनाच ...

आरोग्य विभागाची उद्या ‘गट क’ संवर्गातील भरती परीक्षा

आरोग्य विभागाची उद्या ‘गट क’ संवर्गातील भरती परीक्षा
आरोग्य विभागातील ‘गट क’ संवर्गातील विविध पदांची भरती परीक्षा उद्या २४ ऑक्टोबर रोजी पार ...

Diwali Special sweet dish : सणासुदीत बनवा चविष्ट काजू- ...

Diwali Special sweet dish :  सणासुदीत बनवा चविष्ट काजू- गुलाब बर्फी, जाणून घ्या रेसिपी
दिवाळीत घरच्या घरी चविष्ट गोडधोड बनवायचे असेल तर काजू रोल बर्फी हा देखील चांगला पर्याय ...

“वाडा”

“वाडा”
लेखक श्री. विलास भि. कोळी यांचे “वाडा” हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. आणि न राहवून ...