सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: रविवार, 15 मे 2022 (17:03 IST)

study Tips :अभ्यास कसा करायचा, जाणून घ्या सोप्या टिप्स

study
अभ्यास करताना अनेकदा असे घडते की वाचलेले शब्द आठवत नाहीत किंवा काही विषय वाचल्यानंतर ते आठवत नाहीत इत्यादी. शेवटी , अभ्यास कसा करायचा जेणेकरून वाचलेले शब्द/विषय लक्षात राहतील.या साठी सोप्या टिप्स आहे चला तर मग जाणून घेऊ या. 
 
अभ्यास कसा करावा सोपे टिप्स -
 
प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यासाची पद्धत वेगळी असते पण ध्येय जवळपास एकच असते. म्हणूनच तुम्हाला योग्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार अभ्यास करावा लागेल.काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे अभ्यास करण्यासाठी प्रभावी ठरतात.
 
1 मन एकाग्र करा-
काही वेळा असे होत की ,जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा त्या वेळी तुमच्या मनात नको ते विचार येऊ लागतात ज्यामुळे तुम्हाला एकाग्र होण्यात खूप त्रास होतो, मग अशा स्थितीत काय करावे?
 
 मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि सर्व लक्ष तुमच्या पुस्तकावर केंद्रित करा, सुरुवातीला असे करताना त्रास होईल, पण हळूहळू तुम्हाला त्याची सवय होईल. 
 
* तुमचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी स्वतःला ताजेतवाने करा
* सोपे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा
* अभ्यास करताना शिक्षकांच्या शब्दांचा विचार करा
* अभ्यासाची उद्दिष्टे सेट करा
* नेहमी वेळापत्रकानुसार अभ्यास करा
* कल्पना करणे टाळा
 
2 अभ्यासाची जागा वेळोवेळी बदला-
तुमच्या अभ्यासाची जागा अशा ठिकाणी निवडा जिथे कोलाहल नसणार, आवाजाचा कोणताही त्रास होणार नाही, जिथे तुम्हाला शांतता मिळेल,आणि तुम्ही शांततेने अभ्यास करू शकाल. 
 
* एक शांत जागा निवडा
* आवाज टाळा
* शांत वातावरण शरीराला ऊर्जा प्रदान करते, ज्यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित होण्याची शक्यता वाढते.
 
3 अभ्यासाशी संबंधित प्रेरक विचार वाचा-
 
सकारात्मक विचारांचे वाचन केल्याने मनाला ऊर्जा मिळते, ज्यामुळे काहीतरी करण्याची प्रेरणा आणि मनाचा आत्मविश्वास दोन्ही वाढते. अभ्यासात एकाग्रता करण्यासाठी तुमच्या मनात सकारात्मक विचार असणे अत्यंत आवश्यक आहे.
 
4 योगाभ्यास करा
योग केल्याने आपले मन आणि शरीर पूर्णपणे संतुलित आणि निरोगी राहते आणि आपल्या शरीरात ऊर्जा देखील भरलेली राहते, ज्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोपे होते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या अभ्यास जीवनावर होतो.
 
अभ्यासासाठी निरोगी आणि संतुलित शरीर सर्वोत्तम आहे
योगामुळे लक्ष केंद्रित होण्यास मदत होते
योगामुळे मन ताजे राहते, जे अभ्यासासाठी योग्य आहे.
 
5 अभ्यासासाठी वेळेचे व्यवस्थापन करा
तुम्ही ऐकले असेल की जो काळासोबत चालतो तो सर्व जग जिंकू शकतो, काळ हे असे चक्र आहे की फक्त काळच राजाला रंक आणि रंकाला राजा बनवू शकतो. त्यामुळे वेळेचे महत्त्व समजूनघ्या वेळेचा दुरुपयोग करू नका.
 
गेलेली वेळ पुन्हा येणार नाही, म्हणून वेळेचा बरोबर जा, पुढे किंवा मागे जाऊ नका,  तुम्ही तुमचे अभ्यासाचे वेळापत्रक व्यवस्थापित करा, तसेच तुमची सामाजिक जीवनशैली व्यवस्थापित करा जेणेकरून कोणता काळ कोणता कामासाठी चांगला आहे हे तुम्हाला समजेल.
 
6 शिस्तबद्ध व्हा-
विद्यार्थ्यांनी शिस्त बाळगली पाहिजे कारण विद्यार्थ्याची ओळख ही त्याची शिस्त असते. जेव्हा तुम्ही शिस्तबद्ध व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल की कोणते काम आवश्यक आहे आणि कोणते नाही, शिस्त ही विद्यार्थ्यासाठी सर्वात मोठी शिकवण आहे.
 
* तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा
* उद्यासाठी कोणतेही काम सोडू नका
* वेळेचे अनुसरण करा
*वेळेवर अभ्यास करा
 
7 टाइम टेबल बनवा-
कोणतेही काम सुरू करण्याची आणि पूर्ण करण्याची एक वेळ असते, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी टाइम टेबल बनवावे लागणार, ज्यामध्ये प्रत्येक विषयासाठी 30-60 मिनिटे आणि त्यादरम्यान 5-10 मिनिटे दिली जातात. वेळापत्रक किंवा टाइम टेबल बनवताना ब्रेक टाइम देखील लक्षात ठेवा  जेणे करून अभ्यासाचा कंटाळा येणार नाही.
 
8 पुरेशी झोप घ्या-
झोपेची वेळही निश्चित करा, संशोधनानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने किमान 6-7 तास झोपले पाहिजे. यामुळे शरीर पूर्वीपेक्षा अधिक क्रियाशील राहते, त्यामुळे विद्यार्थ्याची स्मरणशक्ती वाढते, जे अभ्यासादरम्यान अधिक फायदेशीर ठरते .