शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. करिअर मार्गदर्शन
Written By वेबदुनिया|

इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करीयर

NDND
काळाच्या बदलत्या प्रवाहानुसार नवनवीन क्षेत्रे आकार घेत आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटही त्यापैकी एक आहे. भारतीय संस्कृतीत उत्सव, पार्ट्या व समारंभ- सोहळे हे पूर्वीपासून आहेत. परंतु, त्यांचे स्वरूप बदललेले आहे. त्यामागचा उद्देश बदलला आहे. एखादा कार्यक्रम नियोजनबध्द साजरा केला तर त्याचा परिणाम चांगला होतो. त्यातूनच इव्हेंट मॅनेजमेंट ही संकल्पना आली आहे. सहाजिकच तरूणांना आव्हान देणारे नवे करीयर उदयास आले आहे.

एखादे नवीन उत्पादन बाजारात आणण्यासाठी कार्यक्रम, विविध विषयांवरील प्रदर्शने, मेळावे, रोड शो, कॉन्फरन्स असे विविध प्रकारचे कार्यक्रम चांगल्या पध्दतीने नियोजन करून ते यशस्वी करून दाखवण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेची गरज असते. विविध कंपन्याच्या नवीन उत्पादनाचा प्रचार करणे, कार्यक्रमांचे करार करणे, कार्यक्रमाची रूपरेषा आखणे तसेच कार्यक्रमाच्या संबंधित लोकांच्या संपर्कात राहणे, कार्यक्रमाच्या ठिकाणची संपूर्ण व्यवस्था पाहणे अशा विविध जबाबदार्‍या इव्हेंट मॅनेजरला पार पाडाव्या लागतात. इव्हेंट मॅनेजमेंट आता अभ्यासक्रमातही आले असून अनेक ठिकाणी त्याचा एक वर्षाचा कोर्स आहे. खालील संस्‍थांमध्ये तो शिकविला जातो.
1. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेन्ट मॅनेजमेंट, मुंबई.
2. फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे