Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 6 ऑक्टोबर 2010 (07:58 IST)
कॉमनवेल्थ गेम्स: भारत दुसर्या क्रमांकावर
सोमवारचा दिवस भारतासाठी आनंदाचा दिवस ठरला, एकीकडे नेमबाजांनी सुवर्णवेध घेतला तर दुसरीकडे कुस्तीतही भारतीय खेळाडूंनी आपला दबदबा कायम राखत भारताचे नाव उंचावले. गुणतक्त्यात आता भारत दुसर्या क्रमांकावर आला आहे.
पहिल्या क्रमांकावर सर्वाधीक पदकं जिंकत ऑस्ट्रेलिया असून, तिसर्या क्रमांकावर ब्रिटनचा समावेश आहे.
सोमवारी झालेल्या विविध स्पर्धांमध्ये भारताला पाच सुवर्ण पदकं मिळाली आहेत. नेमबाजी व कुस्तीत भारताने सर्वाधीक सुवर्णपदकांची कमाई केली.