Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2010 (14:07 IST)
कलमाडींनी मागितली अपघाताबद्दल माफी
कॉमनवेल्थ गेम्सच्या खेळ ग्राममध्ये झालेल्या अपघाताबद्दल नियोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी युगांडाच्या अधिकार्यांची तसेच उच्चायुक्ताची माफी मागितली आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या कार अपघातात युगांडाचे तीन अधिकारी जखमी झाले आहेत. यात दल प्रमुखांचाही समावेश आहे.
या संदर्भात कलमाडी यांनी युगांडाचे दल प्रमुख तसेच उच्चायुक्ताला माफी मागणारे पत्रही पाठवल्याची माहिती नियोजन समितीचे प्रवक्ते ललित भनोट यांनी दिली आहे.