कॉमनवेल्थ गेम्स: विद्यार्थ्यांना फुकटात प्रवेश!
कॉमनवेल्थ गेम्सकडे प्रेक्षकांनी पाठ केल्याने चिंतेत असलेल्या नियोजन समितीने आता विद्यार्थ्यांना गेम्ससाठी फुटकात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारने हा निर्णय जाहीर केला असून, नियोजन समितीला ही माहिती देण्यात आली आहे. नियोजन समितीने याला हिरवा कंदील दिल्यास विद्यार्थ्यांना फुकटात प्रवेश दिला जाणार असल्याचे दिल्ली सरकारने स्पष्ट केले आहे.