हॉकीत भारताचा झंजावात, पाक पराभूत
कॉमनवेल्थ गेम्समध्ये सेमीफायनलसाठी खेळल्या गेलेल्या हॉकी सामन्यात भारतीय संघाने पाकचा 7-4 असा दणदणीत पराभव केला. उभय देश कट्टर प्रतिस्पर्धी असल्याने सामना पहाण्यासाठी स्टेडियम खचाखच भरले होते. पहिल्या हाप पासूनच भारतीय संघाने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली होती. याचाच फायदा या सामन्यात भारतीय संघाला मिळाला. दुसर्या हाफ पर्यंत भारतीय संघाने 6-2 अशी आघाडी घेतली होती. तिसर्या हाफमध्ये पाक संघाने आक्रमक भूमिका घेतल्याने गोल मधील फरक कमी करण्यात पाक संघाला यश आले. पाक संघाने अखेरच्या हाफमध्ये दोन गोल केल्याने हा सामना 7-4 असा झाला.