'कॉंग्रेसकडून 100 कोटींची ऑफर'
बहुमत ठरावाच्या वेळी सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी किंवा अनुपस्थित राहण्यासाठी कॉंग्रेसकडून 100 कोटी रुपये देण्याचे प्रलोभन आपणास देण्यात आल्याचा गौप्यस्फोट रोहतक मतदार संघातून निवडून आलेले कांग्रेसचे बंडखोर खासदार आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पुत्र कुलदीप विश्नोई यांनी केला आहे.2005
मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतरही कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्या वडीलांना मुख्यमंत्री न बनविल्याच्या कारणावरून कुलदीप यांनी गेल्या अनेक दिवसांपासून कॉंग्रेसविरुध्द खुलेआम बंड पुकारले आहे. आपण सरकारच्या विरोधात मतदान करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.