Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 22 जुलै 2008 (17:34 IST)
गोंधळ निर्माण करण्यात डाव्यांचा हातखंडा: लालू
रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादवांनी गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यात डाव्यांचा हातखंडा असल्याचे स्पष्ट केले आहे. विश्वासमत ठरावावरील चर्चेत लालूंचे भाषण संपूर्ण सभागृहाने गंभीरपणे ऐकले. त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बहुमत सिद्ध करण्याच्या निर्णयाची प्रशंसा केली.
भाजपचे लालकृष्ण अडवाणी यांना लक्ष करत सर्वांनाच पंतप्रधान होण्याची इच्छा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. यास मुलायम, मायावती व आपणसुद्धा अपवाद नाही. लालूंनी आपल्या खास शैलीत आपण अडवाणींची रथ यात्रा रोखून त्यांना अटक केली होती, अशी बढाईही मारली.
विरोधकांच्या अणुकराराविरूद्ध भूमिकेचा समाचार घेताना, अमेरिकन बनावटीचे घड्याळे घालता, तुमची मुले अमेरिकेत शिकतात, तरीही अमेरिकाविरोध, अशी टिपणी केली. देशाच्या समृद्धीसाठी पायाभूत सुविधा अत्यावश्यक घटक असल्याचे सांगून अणुसहकार्य करार त्यासाठी सहाय्यभूत ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.