बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By वार्ता|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 23 जुलै 2008 (11:36 IST)

मनमोहनच्‍या विजयाने अमेरिकेत जल्‍लोष

PTI
पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी भारतीय संसदेत विश्वासमत ठराव जिंकला असला तरीही त्‍यांच्‍या विजयाचा जल्‍लोष सातासमुद्रापार अमेरिकेतही व्‍यक्‍त केला जात आहे. डॉ.सिंग यांनी मिळविलेल्‍या विजयाचे कौतुक करीत अमेरिकेने आता या दोन्‍ही देशांमध्‍ये लवकरच अणू करारास गती मिळणार असल्‍याची अपेक्षा व्‍यक्‍त केली आहे.

भारतात अमेर‍िकेचे राजदूत असलेले डेविड मलफोर्ड यांनी मंगळवारी रात्री माध्‍यमांसाठी प्रसिध्‍दीस दिलेल्‍या एका पत्रकात डॉ.सिंग यांना विजयाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या असून अमेरिका दोन्‍ही देशातील अणू करारासाठी उत्‍सुक असल्‍याचे म्‍हटले आहे.

त्‍यांनी सांगितले, की आम्‍ही भारतासोबत आयएईए, एनएसजी आणि अमेरिकी कॉंग्रेसमध्‍ये या करारास लवकरात-लवकर मंजुरी मिळविण्‍यासाठी सोबत काम केले जाणार आहे.

आयएईएकडून यास मंजुरी मिळाल्‍यानंतर करार 45 सदस्यांच्‍या एनएसजीमध्‍ये पाठविला जाईल. आणि नंतर त्‍यास अमेर‍िकी संसदेत मंजुरीसाठी आणले जाणार आहे.