शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By वेबदुनिया|

रालोआपेक्षा संपुआ सरकार विकासाचे - चिदंबरम

'शेतकरी आत्‍महत्‍या सरकारवरचा डाग'

संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकार हे विकासाचे सरकार असून सरकारने साडेचार वर्षांत देशात मोठया प्रमाणावर विकासाच्‍या योजना राबविल्‍या आहेत. शेतक-यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी सरकारने भरीव काम केले आहे. त्‍यामुळे हे सरकार यापूर्वीच्‍या राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी सरकारपेक्षा कैकपटीने चांगले असल्‍याचा दावा अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी विश्‍वासमत ठरावात सरकाची बाजू मांडताना केला.

शेतक-यांची आत्‍महत्‍या हे सरकारचे अपयश असल्‍याचे मला मान्‍य आहे. मात्र गेल्‍या वर्षी शेतक-यांना सरकारने 66 हजार कोटींची कर्जमाफी दिली. गेल्‍या चार वर्षांपासून राष्‍ट्रीय विकासाचा दर 8ृ9 टक्‍के राखण्‍यात सरकारला सातत्‍याने यश आल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

विश्‍वासमत ठरावा संदर्भात संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असून ठरावाच्‍या संदर्भात मतदानापूर्वी चिदंबरम यांनी सरकारने केलेल्‍या विकास कामांचा पाढा वाचून दाखविला. राष्‍ट्रीय विकासाचा दर, कृषीक्षेत्रासाठी केलेली भरीव तरतुद यासह सरकारच्‍या कामातील पारदर्शकतेबाबत त्‍यांनी मुददेसूद भाषण केले. सरकारने प्रत्‍येक गोष्‍ट पारदर्शीपणे केली. भारत महासत्‍ता व्‍हावा असा कॉंग्रेसपक्षाचा प्रयत्‍न आहे. त्‍यामुळे अणू करार हा देशहिताचा आहे आणि तो देशाचे हित जोपासून करण्‍याची गरज असल्‍याचा पुनरुच्‍चारही त्‍यांनी केला.

सभागृहात त्‍यांचे भाषण सुरू असताना ब-याच वेळा गोंधळ झाला. सभापतिंनी वारंवार समज देउनही सदस्‍यांनी सभागृहात गोंधळ सुरूच ठेवल्‍याने त्‍यांच्‍या भाषणात वारंवार व्‍यत्‍य आणण्‍याचा प्रयत्‍न विरोधकांनी केला.