शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By भाषा|

लोकसभेत 35 वर्षाखालील अडतीस खासदार

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अगाथा के संगमा यांनी चौदाव्या लोकसभा सदस्सत्वाची शपथ घेतली असून सभागृहातील सर्वात तरूण खासदार ठरल्या आहेत. माजी लोकसभाध्यक्ष पी ए संगमा यांच्या त्या कन्या आहेत.

त्यांच्यासोबतच इतर सहा नवनियुक्त सदस्यांनीही सदस्यत्वाची शपथ घेतली. यानंतर लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी तरूण खासदारांचे स्वागत करताना आनंद व्यक्त केला.

इतर दोन नवनियुक्त खासदारांमध्ये भाजपचे अनुराग सिंग ठाकुर व शिवसेनेचे आनंद परांजपे यांचा समावेश आहे. सद्या लोकसभेत 35 वर्षाखालील वयाचे एकूण 38 खासदार झाले असल्याचे लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी सांगितले.

संगमा मेघालयातील तुरा मतदारसंघातून, ठाकुर हिमाचल प्रदेशातील हमिरपूरमधून, तर आनंद परांजपे महाराष्ट्रातील ठाणे मतदारसंघातून निवडून आले आहेत.