शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By भाषा|

विश्वासमतनाट्याचा अंक रंगतदार अवस्थेत

सपुआ सरकारला बहुमतासाठी आवश्यक जादुई आकडाची संख्यापूर्ती झाली नसून सरकारचे भवितव्य अजूनही अधांतरी लटकले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने सरकारचे समर्थन करण्याचा निर्णय जाहीर केल्याने सपुआत जाण फुंकल्या गेली.

मात्र अजित सिंगांच्या रालोदने डाव्या आघाडीत जाणे पसंत केल्याने निराशाही सरकारच्या पदरी पडली. डीएमकेचे बडतर्फ खासदार दयानिधी मारण यांनी विश्वासमत ठरावास समर्थन देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

हैदराबादच्या मुस्लिम मजिलच्या एकमात्र खासदारानेही समर्थन जाहीर केले. मात्र देवेगौडांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने सरकारविरूद्ध जाण्याचे संकेत दिल्याने सरकारला अस्तित्वासाठी तारेवची कसरत करावी लागत आहे.

झामुमोच्या पाठिंब्याच्या बदल्यात सोरेन यांनी कोळसा मंत्रालय व एका खासदारास राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले. मात्र रालोदच्या तीन खासदारांचे समर्थन मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत असताना पक्षाने विरोधात जाण्याची भूमिका घेतल्याने सपुआस जबर धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील राजकारण लक्षात घेता त्यांनी मायावतींच्या कंपूत शिरणे पसंत केले.