सभागृहात अशा घडल्या घडामोडी
अणू कराराच्या मुदयावरून डाव्या पक्षांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर पंतप्रधानांना विश्वासमत प्रस्ताव मांडण्यासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनास आज सुरूवात झाली. अधिवेशनास सुरूवात झाल्यानंतर घडलेल्या काही प्रमुख घडामोडी अशा - 1)
सभापती सोमनाथ चॅटर्जी सकाळी लोकसभेत आले आणि त्यांनी विश्वासमत प्रस्तावापूर्वी राजीनामा देणार नसल्याचे सिध्द केले. 2)
संसदेत साडेचार वर्षातील सर्वाधिक संख्या आज पहावयास मिळाली.3)
सत्ताधा-यांच्या बाजूने एकही आसन रिकामे नव्हते मात्र विरुध्द पक्षाच्या बाजूने काही जागा रिकाम्या होत्या.4)
सभागृहात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अनुपस्थित होते. 5)
राष्ट्रीय जनता दलाचे खासदार पप्पू यादव उर्फ मोहम्मद शाहबुद्दीन सभागृहात उपस्थित. सभागृहाच्या एका विशेष पत्राने त्यांना उपस्थितीसाठी परवानगी मिळविण्यात आली आहे.6)
नेहमीच गंभीर वाटणारे पंतप्रधान मनमोहन सिंग आज प्रचंड आत्मविश्वासात सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींकडे 'व्ही'खूण करून आपला विजय निश्चित असल्याचे पुन्हा अधोरेखित केले. 7)
विश्वासमत प्रस्तावास सुरुवात होण्यापूर्वी विरुध्द पक्ष नेते लालकृष्ण आडवाणी सोबतच्या कुठल्यातरी विषयावर हसतानाही ते दिसून आले. 8)
कामकाजास सुरूवात होताच सभागृहात घोषणाबाजी सुरू झाली. सभापतिंनी समज दिल्यानंतर घोषणा बंद. 9)
मृत सदस्यांना श्रध्दांजली प्रस्तावाच्या वेळीही सदस्यांची चुळबूळ, सभापती रागावल्यानंतर शांतता.10)
पंतप्रधानांनी केवळ तीन ओळीत विश्वासमत प्रस्ताव सादर केला.11)
कॉंग्रेस देशभक्त पक्ष असल्याचा प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन12)
विरोधी पक्ष नेते अडवाणींनी सरकारची अवस्था आयसीयुतल्या रुग्णासारखी झाल्याचा आरोप केला.13)
सरकारला पराभूत करणे हा उददेश सरकार अस्थिर करायची नाही- अडवाणी14)
सरकार बहुमतात- प्रणव मुखर्जी15)
मुखर्जी यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात गोंधळ 16)
सभागृह 3 वाजेपर्यंत तहकूब 17)
कामकाज 3 वाजेनंतर सुरू झाल्यानंतर पुन्हा गोंधळ18)
सदस्यांचे एकमेकाविरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी.