भाषण लिहायला राहुलला लागले पाच तास
राहुल गांधींनी संसदेत विश्वासमत ठरावावर केलेल्या भाषणाच्या तयारीसाठी चांगलीच मेहनत घेतली. भाषण लिहिण्यास आपणास तब्बल पाच तास लागल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. राहुल हे कॉंग्रेसचे सरचिटणीस असून संसदेत ते अमेठी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. विश्वासमत ठरावावर लोकसभेत पहिल्या दिवसाची कारवाई बघतानाच राजधानीतील तुघलक रस्त्यावरील घरी त्यांनी हे भाषण लिहिले. देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अणुसहकार्य करार आवश्यक असल्याची भूमिका सभागृहात मांडल्यानंतर त्यांनी वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला.