शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By वेबदुनिया|

महागाई नियंत्रणात सरकार सपशेल अपयशी- मल्‍होत्रा

मनमोहन सरकार सर्वच पातळींवर अपयशी ठरली असून महागाईवर नियंत्रण मिळविण्‍यात जगभरातील देशांनी यश मिळविले असताना मनमोहन सरकार ते मिळविण्‍यात साफ अपयशी ठरले आहे. सरकारने कराराच्‍या बाबतीत जनतेची दिशाभूल केली असून सपशेल खोटे बोलले गेल्‍याचा आरोप भाजपचे विजयकुमार मल्‍होत्रा यांनी केला आहे.

सरकारवर खोटारडेपणाचा आरोप करताना मल्‍होत्रा म्‍हणाले, गेल्‍या ब-याच दिवसांपासून सरकार करारामागील सत्‍य दडवून ठेवत आहे. करार जनतेची
दिशाभूल करणारा असल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला. महागाईच्‍या मुदयावर सरकारवर आरोप करताना त्‍यांनी सांगितले, की जगभरातील देशांनी महागाईचा दर 3 ते 4 टक्‍क्‍यापर्यंत नियंत्रणात ठेवण्‍यात यश मिळविले असताना भारतात महागाईचा दर 12 टक्‍क्‍यावर गेला आहे. महागाईने सर्वसामान्‍य माणसाचे जगणे कठीण केले आहे. यामागे केवळ सरकारचे अपयश आहे.

झारखंड मुक्‍ती मोर्चाचे खासदार विकले गेल्‍याचा आरोप करताना त्‍यांनी संपुआवर संसदेचा अपमान केल्‍याचा आरोप केला. त्‍यांच्‍या या आरोपानंतर राष्‍ट्रीय जनता दलाचे खा.पप्‍पू यादव यांनी मल्‍होत्रा यांनीही आपल्‍याला खरेदी करण्‍याचा प्रयत्‍न केला ते आपणास जेलमध्‍ये भेटण्‍यासाठी आले असल्‍याचा आरोप करताच भाजप व रालोआ खासदारांमध्‍ये जोरदार गोंधळ होउन दोन्‍ही पक्षाचे खासदार आमने-सामने आले. परिस्थिती गंभीर होत चालल्‍याचे पाहुन सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी सभागृह 12ृ15 वाजेपर्यंत तहकुब केले.