शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. विश्वास-अविश्वास
Written By वेबदुनिया|

सट्टा बाजारात मनमोहन जिंकले

30 अब्‍ज रुपयांचा सट्टा

संपुआ सरकार बहुमत सिध्‍द करण्‍यात यशस्‍वी होईल किंवा नाही हे आकडयांच्‍या युध्‍दात आजतरी सांगणे कठीण आहे. असे असले तरीही सट्टा बाजारात मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग बहुमत सिध्‍द करण्‍यात यशस्‍वी ठरले आहेत. सरकार पाडण्‍या आणि जोडण्‍यासाठी दोन्‍ही बाजूने प्रयत्‍न केले जात आहेत.

क्रिकेटमध्‍ये सट्टा लावून लाखों रुपयांची कमाई करणा-या सटो-यांनी यावेळी राजकीय खेळात पेसा लावला आहे. एका बुकीकडून नाव जाहीर न करण्‍याच्‍या अटीवर दिलेल्‍या माहितीनुसार मनमोहन सरकारच्‍या बाजूने 30 अब्‍ज रुपयांचा सट्टा लावण्‍यात आला आहे.


सट्टा बाजारात सरकारच्‍या विजयाच्‍या बाजूने 38 पैसे तर पराभवाच्‍या बाजूने 2.90 रुपयांचा भाव मिळत आहे. जवळ-जवळ सर्वच पक्षांना फुटीची कीड लागली असून बहुमत सिध्‍द करण्‍याच्‍या कसरती दरम्‍यान अनेक खासदार पक्ष धोरणाच्‍या विरोधात मतदान करण्‍याच्‍या शक्‍यतेमुळे सरकारचा सटो-यांच्‍या मते सरकारचा बहुमताच्‍या महाभारतात विजय निश्चित आहे. सरकारने 270 खासदार आपल्‍या बाजूने वळविण्‍यात यश मिळविल्‍याने केवळ 2 खासदारांची आवश्‍यकता आहे. त्‍यामुळे सरकार बहुमत सिध्‍द करण्‍यात यशस्‍वी होण्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

सट्टा बाजारात आतापर्यंत 30 अब्‍ज रुपये लावण्‍यात आलेले आहेत हा आकडा मंगळवारपर्यंत 35 अब्‍ज रुपयांपर्यंत जाण्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे.