बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (09:10 IST)

महाराष्ट्रात कोविड -19 ची 5225 नवीन प्रकरणे, आणखी 154 रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात गुरुवारी कोविड -19 चे 5,225 नवीन रुग्ण दाखल झाल्यामुळे, संक्रमित लोकांची एकूण संख्या 64,11,570 झाली आहे, तर आणखी 154 रुग्णांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या 135567 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या 24 तासांमध्ये 5,557 रुग्ण संसर्गातून बरे झाल्याची पुष्टी झाली आहे, त्यानंतर संसर्गमुक्त झालेल्या लोकांची संख्या 62,14,921 झाली आहे.
 
महाराष्ट्रात कोविड -19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 57,579 झाली आहे. संसर्गातून बरे होण्याचा दर 96.93 टक्के झाला आहे तर मृत्यू दर 2.11टक्के आहे.महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसात कोविड -19 चे एकही नवीन प्रकरण समोर आले नाही.आतापर्यंत महाराष्ट्रात कोविड -19 साठी 5,17,14,950 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे, त्यापैकी गेल्या 24 तासांमध्ये 2,25,870 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.
 
अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 762 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर सातारा जिल्ह्यात 707 नवीन रुग्ण आढळले. सातारा जिल्ह्यातच गेल्या 24 तासांत 37 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या 24तासांत राज्यातील आठ विभागांपैकी पुणे विभागात सर्वाधिक 67 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर कोल्हापूर विभागातील संसर्गामुळे 39 लोकांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत राजधानी मुंबईत कोविड -19 चे 282 नवीन रुग्ण आढळले, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला.