आशिया चषकही रद्द होणार : टीम इंडियाला मोठा धक्का बसणार
कोरोनामुळे क्रिकेट क्षेत्रातील आणखी एक मोठी स्पर्धा (आशिया चषक) रद्द होण्याची शक्यता असून हा टीम इंडिाला मोठाधक्का मानला जात आहे.
कोरोनामुळे जगभरातील सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द अथवा स्थगित केल्या आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, आफ्रिका आदी सर्व देशांतील द्विपक्षीय मालिका स्थगित करण्यात आल्या आहेत. जगातील सर्वात श्रीमंत टी-20 लीग असलेली आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. आयपीएल स्पर्धेत अन्य देशातील खेळाडू खेळत असल्यामुळे त्याचा फटका त्यांनाही बसेल. कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट पुन्हा कधी सुरू होईल हे माहीत नाही.
येत्या काही महिन्यात होणारी आशिया कप स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. आशियाई क्रिकेट काउंसिलची या स्पर्धा संदर्भातील बैठक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. एसीसीकडून आशिया कपचे आयोजन केले जाते. नियोजित वेळेनुसार ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात होणार होती. पण सध्याच्या परिस्थितीत स्पर्धा होईल असे वाटत नाही.
पुढील आशिया कप स्पर्धा कधी आणि कुठे घेण्यासंदर्भात एसीसीची बैठक हणोर होती, पण ही बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. या वर्षी आशिया कप स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण बीसीसीआयने भारतीयक्रिकेटपटू कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात खेळणार नाहीत अशी भूमिका घेतली होती.
भारताच्या या भूमिकावर पीसीबी आणि एसीसीला माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत एसीसीकडे दोनच पर्याय शिल्लक राहतात एक म्हणजे भारताशिवाय ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये घ्यायची किंवा भारतासह स्पर्धेचे ठिकाण बदलून दुबईत त्याचे आयोजन करायचे. या संदर्भातच एसीसीची बैठक 29 मार्च रोजी होणार होती. पण ही बैठक कोरोनामुळे स्थगित करण्यात आली आहे. या बैठकीच्या आधी सौरव गांगुली यांनी भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळू शकतो. पण स्पर्धा अन्य ठिकाणी झाली पाहिजे. पाकिस्तानसाठी ही बाब मोठा झटका देणारी आहे. पाक बोर्डाला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू करायचे असल्याने त्यांना आशिया कप स्पर्धा पाकिस्तानमध्ये व्हावी अशी इच्छा आहे.