शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated :माद्रिद , शनिवार, 4 एप्रिल 2020 (15:16 IST)

स्पेनच्या राजकुमारीचा कोरोनाने घेतला बळी

करोना व्हायरसमुळे युरोपातील अनेक देशात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे. अशातच एक धक्काधादाक बातमी समोर आली आहे. स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसा यांचे करोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. करोनामुळे राजघराण्यातील व्यक्तीचे निधन होण्याची ही पहिलीच घटना आहे.

मारिया टेरेसा यांचे वय  86 होते. मारिया स्पेनचे राजा फेलिपे सहावे यांची बहिण होत्या. मारिया यांचे भाऊ राजकुमार सिक्टो एनरिक डी बोरबोन यांनी फेसबुकवरून निधनाची माहिती दिली. राजकुमारी मारिया यांचे फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये निधन झाले. स्पेनचे राजे फेलिपे यांची करोना व्हायरस संदर्भातील चाचणी नुकतीच घेण्यात आली आणि त्यानंतर मरिया यांच्या निधनाचे वृत्त आले. दिलासा देणारी बाबा म्हणजे फेलिपे यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. 28 जुलै 1933 रोजी जन्मलेल्या राजकुमारी मारिया यांनी त्यांचे शिक्षण फ्रान्समध्ये घेतले होते. त्यानंतर त्या पॅरिस येथील विद्यापिठात प्राध्यापक म्हणून काम करत होत्या. आपल्या मुक्त विचारांमुळे मारिया यांची जनसामान्यात ओळख होती. त्या लोकप्रिय देखील होत्या आणि रेड प्रिसेस अशा नावाने त्यांना ओळखले जात असे.