शहरातील 81 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला, सिरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष

pimpari chinchwad mahapalika
Last Modified शनिवार, 3 जुलै 2021 (09:53 IST)
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर संस्था आणि वैद्यकीय विभागाने केलेल्या सिरो सर्वेक्षणात शहरातील 10 हजार 82 नागरिकांच्या रक्त नमुन्याची तपासणी केली. त्यात तब्बल 8 हजार 207 नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडीज (प्रतिपिंड) विकसित झाल्या आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ते सक्षम आहेत. याचे प्रमाण 81.40 टक्के आहे. गावठाण भागातील सर्वाधिक म्हणजेच 84.5 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आहे. तर, 1 हजार 875 नागरिकांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून त्याचे प्रमाण 18.6 टक्के आहे.
दुस-या लाटेनंतर शहरातील किती नागरिकांमध्ये कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी ॲण्टीबॉडीज तयार झाल्यात किंवा नाहीत, याचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेने सिरो सर्वे केला. तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर 6 वयोगटापासून पुढील नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यासाठी शहरात 200 क्लस्टर निर्माण करण्यात आले होते. 16 ते 26 जून दरम्यान 21 फिल्ड टीमच्या माध्यमातून हा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञासह इतर कर्मचा-यांचा समावेश होता. झोपडपट्या, चाळी, गावठाण, गृहनिर्माण संस्था या भागातील 10 हजार 82 व्यक्तींच्या रक्त नमुन्यांची शास्त्रीय तपासणी करण्यात आली आहे.
6 ते 18 वयोगटातील मुलांचे पालकांच्या संमतीने नमुने घेतले. 6 ते 18 वयोगटातील 1630, 18 ते 44 मधील 5226, 45 ते 60 मधील 1987 आणि 60 वर्षांपुढील 1239 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले.

6 ते 18 वर्षांच्या मुला-मुलींमध्ये 70.6 टक्के, 18 ते 44 वयोगटामध्ये 78.9 टक्के, 45 ते 60 वयोगटातील लोकांमध्ये 91.1 टक्के तर 60 वर्षांपुढील नागरिकांमध्ये 90.5 टक्के अँटीबॉडी आढळल्या आहेत. झोपडपट्टीतील 1464, चाळीतील 2319 आणि सुशिक्षित 6299 नागरिकांचे नमुने तपासले. त्यात झोपडपट्टीतील 82.5 टक्के, गावठाण भागातील 84.5 टक्के आणि सोसायट्यामध्ये 80 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज दिसुन आलेल्या आहेत. म्हणजेच त्यांना कोरोना होऊन गेला आहे.
81.5 टक्के महिलांमध्ये आणि 81.3 टक्के पुरुषांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. महिला, पुरुषांमध्ये अँटीबॉडीज असण्याचे प्रमाण साधारणत: सारखेच दिसून आलेले आहे. एकूण 81.40 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या. त्यात गावठाण भागातील सर्वांधिक लोकांना कोरोना होऊन गेला आहे. पूर्वी ज्यांना कोरोना होऊन गेला. त्यामध्ये अँटीबॉडीजचे प्रमाण 95.60 टक्के आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ”सर्वेसाठी 180 लोकांची नियुक्ती केली होती. 15 दिवसांत सर्वे पूर्ण केला. 10 हजार नमुन्यांची सिरो सर्वे करणारी पिंपरी-चिंचवड पहिली महापालिका एकमेव आहे. त्यात 81. 40 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या. ही बाब पॉझिटीव्ह आहे. या स्थितीत मोठी लाट येईल असे वाटत नाही”.
वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ”शहरातील 10 हजार नागरिकांचा सिरो सर्वे करण्यात आला. तीन क्लस्टरमधून नागरिकांचे रक्त नमुने घेतले होते. 6 वर्षांपुढील नागरिकांचा सर्वे केला. 81.40 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज असल्याचे दिसून आले. पुरुष आणि महिलांमध्ये समान अँटीबॉडीज आहेत. जरी 80 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज असतील. तरी, नवीन येणा-या डेल्टा व्हायरसबाबतीत या अँटीबॉडीजचा उपयोग होतो की नाही. याबाबत अद्यापही अभ्यास चालू आहे. त्यामुळे डेल्टाचा मुकाबला करण्यासाठी उपयोग होतो की नाही आत्ता सांगणे योग्य होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करत काळजी घ्यावी”.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

ओमिक्रॉनचा कहर? दक्षिण आफ्रिकेत एका दिवसात कोरोनाचे रुग्ण ...

ओमिक्रॉनचा कहर? दक्षिण आफ्रिकेत एका दिवसात कोरोनाचे रुग्ण दुपटीने वाढले
दक्षिण आफ्रिकेत कोविड-19 चे नवीन रुग्ण एका दिवसात जवळपास दुप्पट झाले आहेत. बुधवारी देशात ...

बाळूमामा आणि काळूबाईसारख्या धार्मिक-अध्यात्मिक मालिकांचा ...

बाळूमामा आणि काळूबाईसारख्या धार्मिक-अध्यात्मिक मालिकांचा ट्रेंड का वाढतोय?
'अगडदुम नगारा, सोन्याची जेजुरी....बोल अहंकारा, सदानंदाचा येळकोट' हे गाणं ऐकू आलं की, ...

संप करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यावर शासन ...

संप करत असलेल्या  एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यावर शासन गंभीर आहे  – अनिल परब
एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून अंतरिम पगारवाढीचा निर्णयही घेतला. मात्र ...

संमेलनस्थळी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण; ओमिक्रॉन ...

संमेलनस्थळी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण; ओमिक्रॉन पार्श्‍वभुमीवर केले जातेय थर्मल स्कॅनिंग
शहरात होत असलेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साहित्य प्रेमींचा मोठा ...

अभिजात मराठी दालनातून भाषेचे ऐश्‍वर्य जगभर पोहोचवणार :

अभिजात मराठी दालनातून भाषेचे ऐश्‍वर्य जगभर पोहोचवणार : देसाई
नाशिक । मराठी भाषा विभागाच्यावतीने अभिजात मराठी दालन उभारण्यात आले आहे. मराठी भाषा अभिजात ...